Shivsena UBT Setback : ठाकरे गटाला मोठा धक्का! असंतोषाचा स्फोट, निष्ठावंत शिवसैनिकांची शिंदेंच्या शिवसेनेकडे धाव

Kokan politics : कोकणात लोकसभा, विधानसभेपाठोपाठ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे हादरे बसले आहेत. येथील रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंचा बालेकिल्ला कोसळला असून शिंदे गट आणि भाजपने मोठी घुसखोरी केली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on
Summary
  • दापोलीत ठाकरे गटाच्या शिवसेनेसमोर कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे

  • अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आता शिंदे गटाकडे वळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे

  • स्थानिक नेतृत्वाकडून अपेक्षित लक्ष न मिळाल्याने पक्षाची ताकद कमी होत आहे

Ratnagiri News : गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा फक्त आमदार निवडून आला आहे. तर नुकताच पार पडलेल्या नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्याच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या शिवसेनेची पिछेहाट झाली आहे. यातच येथे स्थानिक पातळीवर नेतृत्व दिसून येत नाही किंवा पक्ष नेतृत्वाकडून याबाबत अपेक्षित लक्ष देताना दिसत नाही. यामुळेच आता निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर त्यांचा ओढा शिंदे शिवसेनेकडे दिसत असून उरली सुरली शिवसेना शेवटची घटका मोजताना दिसत आहे.

कोकणात नुकताच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजप आणि शिवसेनेच्या वादळासमोर पालापाचोळा झाला. रत्नागिरीत १५१ नगरसेवकांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त १७ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७७ पैकी फक्त ८ नगरसेवक निवडणूक आले आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारांचे अनामत रक्कमही जप्त झाली आहे. यामुळे कोकणात निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. ज्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत राजीनाम्याचे वादळ उठले होते.

हे वादळ शांत होत नाही तोच कोकणातील जिल्हा परिषदेतही शिवसेनेने आपले नंबर १ चे स्थान भक्कम केले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील तीन जिल्हा परिषदांत शिंदेंच्या शिवसेनेने जवळपास ७४ जागा जिंकल्या. भाजपने जवळपास ५० जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. इतर पक्षांकडे ३० ते ३५ जागा गेल्या. मात्र कधीकाळी गड असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त १० जागा जिंकता आल्या. शिंदेंच्या शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० पैकी १३, रत्नागिरीत ५६ पैकी ४० आणि रायगडमध्ये ५९ पैकी २१ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला.

Uddhav Thackeray
Shivsena UBT : ZP निवडणुकीत तोंडघशी पडलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची पुन्हा नौटंकी, पक्षाचा व्हीप झुगारत अर्ज केला अन् माघारही घेतली..भाजपची पुन्हा सरशी!

या भक्कम विजयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेपुढे आता शिवसेनेचे मोठे आव्हान उभे ठाकले असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सुर उमटू लागले आहेत. तर आता स्थानिक पातळीवर पक्ष नेतृत्वाकडून अपेक्षित पुढाकार न मिळाल्याने दापोलीत पक्ष फुटीचे संकेत मिळत आहेत. तसेच शिवसैनिकांसह मतदारांना एकसंघ करण्यात पक्ष नेतृत्व सपसेल अपयशी ठरल्याचीही आता टीका होताना दिसत आहे.

कधीकाळी दापोली मतदारसंघ हा रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण आता रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांच्या रणनीतीमुळे पुर्ण ढासळला असून तो त्यांनी ताब्यात घेतला आहे. तर ठाकरेंचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांचा येथे प्रभाव कमी होताना दिसत आहे. कदाचित ते कदम पिता-पुत्रांशी सेटमेंट करत असावेत अशीच येथे कुजबूज आहे. नुकताच त्यांनी याबाबत भाष्य देखील केले होते.

पण आता ठाकरेंचा भक्कम कणा मानला जाणारा दापोली मतदार संघावर शिंदेंच्या शिवसेनेचा ताबा असून याचा प्रभाव संपूर्ण जिल्ह्यातील राजकारणात पडताना दिसत आहे. पक्षफुटीनंतर येथून संघटनेला लागलेली गळती आता जिल्ह्यातील गावागावापर्यंत पोहचली आहे. स्थानिक नेतृत्वाचा कमी झालेला संवाद आणि पक्ष नेतृत्वाचे दुर्लक्षामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये कमालीची नाराजी वाढत आहे.

दरम्यान आता पक्षाने भाकरी फिरवत आधी रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांना काढत बदल करण्यात आले. खेडेकर यांना पदावरून दूर करत आ. भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. पण अद्याप अपेक्षित संघटन बांधणी झालेली नाही. कार्यकर्त्यांना दिशा देण्याचा कोणताच कार्यक्रम अद्याप विक्रांत जाधव यांच्याकडून झालेला नाही.

यामुळे दापोलीत गावागावातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमित वातावरण असून निष्ठावंत कार्यकर्ते निष्क्रिय झाले आहेत. तर काही थेट शिंदेंच्या शिवसेनेशी पा मिळवणी करताना दिसत आहेत. थेट प्रवेश करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. याचा थेट परिणाम शिवसेनेच्या उरल्या सुरल्या संघटनेवर परिणाम होताना दिसत आहे. तर असाच ओढा राहिल्यास ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, असा तर्क राजकीय निरीक्षकांचा आहे.

Uddhav Thackeray
Shiv Sena UBT : गरम तेलामुळे उद्धव ठाकरेंचा उमेदवार गंभीर जखमी; मतदानाला काही तास शिल्लक असताना घडला धक्कादायक प्रकार

FAQs :

1. दापोलीत ठाकरे गट अडचणीत का आहे?
स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याने आणि नेतृत्वाकडून लक्ष न मिळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

2. कार्यकर्ते शिंदे गटाकडे का वळत आहेत?
राजकीय संधी, स्थानिक पातळीवरील सक्रियता आणि नेतृत्वामुळे कार्यकर्ते शिंदे गटाकडे आकर्षित होत आहेत.

3. या बदलाचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल?
शिंदे गटाची ताकद वाढू शकते आणि ठाकरे गटाची पकड कमी होण्याची शक्यता आहे.

4. कोकणातील राजकारणावर याचा परिणाम होईल का?
होय, दापोलीसह संपूर्ण कोकणात नवीन राजकीय समीकरणे तयार होऊ शकतात.

5. ठाकरे गटासाठी पुढचा मार्ग काय?
कार्यकर्त्यांशी संवाद वाढवून आणि स्थानिक नेतृत्व मजबूत करून पक्षाला पुन्हा उभारी मिळवावी लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com