New Delhi : अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव करत भल्याभल्यांची भविष्यवाणी खोटी ठरवली आहे. मात्र, ट्रम्प यांच्याविषयी एका प्राण्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याने त्याचीच चर्चा होऊ लागली आहे.
‘नास्त्रेदमल’ या नावाने प्रसिध्द असलेल्या प्रसिध्द प्रोफेरस एल लिक्टमैन यांनी केलेली भविष्यवाणी बहुतेकवेळा खरी ठरली आहे. मात्र, यावेळी ते चुकले आहेत. त्यांनी कमला हॅरिस विजयी होतील असे सांगितले होते.
लिक्टमैन हे 1984 पासून अमेरिकेच्या निवडणुकीविषयी भविष्यवाणी करत आले आहेत. त्यांची भविष्यवाणी 10 पैकी 9 वेळा खरी ठरली आहे. त्यांनीच 2016 मध्ये ट्रम्प यांच्या विजयाबाबत भविष्यवाणी केली होती.
थायलंडमधील खाओ खेओ खुल्या प्राणीसंग्रहालयात मू डेंग हा प्रसिध्द पाणघोडा आहे. मू डेंगने ट्रम्प यांच्याविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. चार नोव्हेंबरला ही भविष्यवाणी करण्यात आली होती. मू डेंग सोशल मीडियात आधीपासूनच आहे. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.
प्राणीसंग्रहालयात मू डेंगसाठी दोन टरबूज ठेवण्यात आले. एका टरबुजावर डोनाल्ड ट्रम्प आणि एकावर कमला हॅरिस यांचे नाव लिहिण्यात आले होते. त्यानंतर हे टरबूज खाण्यासाठी मू डेंग पाण्यातून बाहेर आला. त्याने दोनपैकी एका टरबुजाकडे धाव घेतली. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव लिहिले होते. याआधारे मू डेंगने डोनाल्ड ट्रम्प विजयी होतील, अशी भविष्यवाणी केल्याचे त्यावेळी मानले जात होते. आता ते खरे ठरले आहे.
अनेक प्री पोल सर्व्हेमध्ये ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात चुरशीची टक्कर होईल, असे सांगितले जात होते. काहींनी कमला हॅरिस यांचे पारडे जड असल्याचे सांगितले होते. पण निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांनाच धक्का देत ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले आहेत.