Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump : AK-15 रायफल अन् 120 मीटर अंतर..! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची Inside Story…

America Former President Donald Trump President Election : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला केलेल्या हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याजवळ एक रायफल सापडली आहे.

Rajanand More

New Delhi : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टॅम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून टॅम्प थोडक्यात बचावले असले तरी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकन स्नायपरने हल्लेखोराचाही खात्मा केला आहे.

हल्लेखोराने झाडलेली एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. त्यामुळे ट्रम्प यांच्या हत्येचा हल्लेखोराचा कट असल्याचे उघड झाले आहे. थॉमस मॅथ्यू क्रुक्स असे या 20 वर्षीय हल्लेखोराचे नाव आहे. तो पेंसिल्वेनिया येथील रहिवासी असल्याचे यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या भागातील बटलर येथे ट्रम्प यांची सभा सुरू होती.

ट्रम्प आणि हल्लेखोरामध्ये जवळपास 120 मीटरचे अंतर होते. प्रचारसभेपासून जवळच असलेल्या एका इमारतीच्या छतावर तो होता. तिथूनच त्याने ट्रम्प यांच्या दिशेने सुमारे दहा गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. गोळीबारानंतर यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या स्नायपरने हल्लेखोराला अचूक टिपले. त्याच्या डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला.

हल्लेखोराने हल्ला करण्यासासाठी एआर-15 सेमी-ऑटोमेटिक रायफलचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही रायफल त्याच्याकडे कशी आली, यामागे कुणाचे षडयंत्र होते, याचा शोध अमेरिकन तपास यंत्रणा घेत आहेत. यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. ही रायफल काही देशांच्या लष्कराकडूनही वापरली जाते.

दरम्यान, हल्ला झाल्यानंतर ट्रम्प हे व्यासपीठावर खाली बसले. तातडीने सुरक्षारक्षकांनी त्यांना गराडा घातला. काही क्षणानंतर त्यांना तिथून हलवण्यात आले. यावेळी त्यांच्या कानाजवळ आणि चेहऱ्या रक्त दिसत होते. व्यासपीठावरून जाताना त्यांनी हात उंचावत समर्थकांच्या दिशेने वर्जमूठ दाखवली.  

ट्रम्प यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांनी यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांचे आभार मानले आहेत. त्यांच्यामुळे आपण वाचल्याची भावना ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. तसेच गोळीबारात मृत्यू झालेल्या समर्थकाविषयीही त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT