America Vs China : अमेरिका आणि चीनमधील टेरिफ वॉर आता टोकाला पोहचले आहे. दोन्ही देश माघार घ्यायला तयार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळून इतर देशांवरील टेरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे. पण चीनवरील कर 125 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे चीनही खवळला असून थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या मालावर 125 टक्के कर लावला आहे. त्यावरून चीनकडूनही टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आपल्याला व्यापार युध्द नकोय, अशी मवाळ भूमिका घेतानाच चीनने अमेरिकेला इशाराही दिला आहे. आम्ही टेरिफच्या धमक्यांना घाबरत नाही, सामना करण्यासाठी तयार आहोत, असे चीनने म्हटले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी आपल्या देशाला व्यापार युध्द नको असल्याचे म्हटले आहे. पण जर अमेरिका सतत धमक्या देणार असेल तर आमच्याकडूनही त्यावर कारवाई होईल. आमच्या देशाच्या अधिकारांना आणि हिताला धोका निर्माण होत असेल तर चीन गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील कर वाढवताना म्हटले होते की, जगभरातील बाजाराविषयी चीनने दाखविलेल्या अनादरामुळे त्यांच्यावरील टेरिफ तातडीने 125 टक्के करत आहे. अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस आता संपले, याची जाणीव चीनला लवकरच होईल.
अमेरिकेने चीनवर एका आठवड्यातच 84 टक्के कर वाढवला आहे. हा चीनसाठी सर्वात मोठा झटका मानला जात आहे. सुरूवातीला ट्रम्प यांनी चीनवर 54 टक्के कर लावला होता. त्यानंतर तो वाढवून 104 टक्के करण्यात आला. आता तो 125 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. हा जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
लिन जियान यांनी अमेरिकेचा उद्देश शेवटी फेल होणार असल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या टेरिफबाबतच्या निर्णयाला जनतेचे समर्थन नाही, असेही ते म्हणाले होते. टेरिफ वॉरनंतरही चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये तेज आहे, हे विशेष.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.