BJP  Sarkarnama
देश

BJP Leaders Death : मोठी दुर्दैवी दुर्घटना : उत्तर प्रदेशच्या नवीन आमदार निवासावरून पडून माजी मंत्र्याचा मृत्यू, भाजपसह राजकीय वर्तुळात शोककळा

BJP Leader Nanak Ram Bhurji Dies : लखनौऊमधील आमदार निवासाच्या सातव्या मजल्यावरून पडून भाजप नेते तथा माजी राज्यमंत्री नानक दीन भुर्जी यांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

Aslam Shanedivan

Former Uttar Pradesh Minister Dies News : उत्तर प्रदेशच्या राजकारणात धक्कादायक घटना घडली असून, भाजपचे नेते तथा माजी राज्यमंत्री नानक दीन भुर्जी यांचा मृत्यू झाला. लखनौऊमधील आमदार निवासाच्या सातव्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला असून, ही घटना मंगळवारी (ता. २८) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला. आता या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भुर्जी हे भाजपच्या मागासवर्गीय सेलचे राज्य सरचिटणीसही होते.

६८ वर्षीय भुर्जी हे सपाच्या सरकारमध्ये माजी राज्यमंत्री होते. लखनौऊच्या हजरतगंज भागातील दारुलशफा नवीन आमदार निवासस्थानाच्या सातव्या मजल्यावरून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आमदार निवासस्थान आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी भुर्जी हे गंभीर जखमी अवस्थेत होते. त्यांचे दोन्ही पाय मोडले होते. यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन विभागात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांना ही दुःखद बातमी देण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पण, या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, हा घातपात होता की अपघात, याबाबत जोरदार चर्चा केली जात आहे. पोलीसदेखील याचा आता तपास करत आहेत. दरम्यान या घटनेचे नेमके कारण हे अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार भुर्जी काही काळापासून नैराश्याने ग्रस्त होते आणि त्यांना अनेकदा आमदारांच्या निवासस्थान परिसरात फिरताना पाहिले गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT