Former BSP MP Arvind Chaudhary Joins BJP Sarkarnama
देश

Former MP Join BJP : निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार तथा माजी CBI अधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश; उत्तर प्रदेशमध्ये बसपाला धक्का

Former BSP MP Arvind Chaudhary Joins BJP : उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून बसपाच्या माजी खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Aslam Shanedivan

Uttar Pradesh News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये भाजपची ताकद आणखी वाढली आहे. बहुजन समाज पक्षाचे (BSP) माजी खासदार अरविंद चौधरी आणि सीबीआयचे माजी उपअधीक्षक (DSP) अनिल यादव यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश भाजप अध्यक्ष पंकज चौधरी यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.

लखनौ येथील भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी दोन्ही नेत्यांचे पक्षात स्वागत केले. बांदा येथे राहणारे माजी सीबीआय अधिकारी अनिल यादव यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मंत्री धर्मपाल सिंह आणि दयाशंकर सिंह उपस्थित होते.

अरविंद कुमार चौधरी बुधवारी सकाळी आपल्या समर्थकांच्या मोठ्या ताफ्यासह बस्तीहून लखनौ येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अरविंद चौधरी हे २००९ ते २०१४ या कालावधीत बस्तीचे खासदार होते. ते बस्तीचे विद्यमान समाजवादी पक्षाचे खासदार राम प्रसाद चौधरी यांचे भाचे आहेत.

माजी सीबीआय अधिकारी अनिल यादव यांनी २०१५ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले. त्यांनी वडील बी. पी. यादव यांच्या नावाने स्थापन केलेल्या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य केले. अनिल यादव यांचे वडील बी. पी. यादव हे समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष होते.

ऑक्टोबर २०२० मध्ये तत्कालीन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत अनिल यादव यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांनी समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात या पक्षप्रवेशांची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT