Rajnath Singh Sarkarnama
देश

Rajnath Singh mango : 'मँगो मॅन' कलिमुल्ला खान यांचा 'राजनाथ आंबा' चर्चेत; काय आहे कारण...

Mango Man Kaleem Ullah Khan Names New Mango Variety After BJP Defence Minister Rajnath Singh in Uttar Pradesh : 'मँगो मॅन' कलिमुल्ला खान यांनी मलिहाबाद इथल्या त्यांच्या बागेत कलम तंत्राचा वापर करून आंब्याची नवीन प्रजाती विकसित केली आहे.

Pradeep Pendhare

Uttar Pradesh Mango Man : उत्तर प्रदेशातील 'मँगो मॅन' अशी ओळख असणाऱ्या कलिमुल्ला खान यांनी नव्याने विकसित केलेल्या आंब्याच्या नव्या प्रजातीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव दिले आहे.

मलिहाबाद इथल्या त्यांच्या बागेत कलम तंत्राचा वापर करून कलिमुल्ला यांनी आंब्याची नवीन प्रजाती विकसित केली आहे, या आंब्याच्या प्रजातीला त्यांनी 'राजनाथ आंबा', असे नाव दिले आहे.

पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी (Terrorist) जम्मू-काश्मीरच्या पहलगाम इथं हल्ला केला. यात भारतातील 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली.

पाकिस्तानने भारताविरुद्ध (India) एकप्रकारे युद्धजन्य स्थिती निर्माण केली. ड्रोन हल्ले चढवले. भारतीय लष्करानं या परिस्थितीला संयमानं, पण तेवढ्यात ताकदीने जोरदार प्रत्युत्तर दिले. यात सर्वात संयमाची भूमिका निभावली ती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी! यामुळेच उत्तर प्रदेशातील 'मँगो मॅन' कलिमुल्ला खान यांनी नव्याने विकसित केलेल्या आंब्याच्या नव्या प्रजातीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव दिले आहे.

कलिमुल्ला खान म्हणाले, "नुकताच पाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षामध्ये राजनाथ सिंह यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली आणि युद्धाऐवजी शांतता प्रस्थापित व्हावी अशी त्यांची इच्छा होती." संघर्ष हा कोणत्याच समस्येचा तोडगा होऊ शकत नाही, शांततेच्या मार्गाने तोडगा निघू शकतो, असे मतही कलिमुल्ला यांनी व्यक्त केल.

राजनाथ यांचे नाव देण्याबाबत माध्यमांशी बोलताना कलिमुल्ला म्हणाले, "देशाच्या विकासासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे मी कलमतंत्राचा वापर करून विकसित केलेल्या आंब्याच्या नव्या प्रजातींना देतो. त्यांची नावे भावी पिढ्यांच्या स्मरणात राहावी हाच माझा हेतू आहे. कधीकधी नागरिक थोर नेत्यांना विसरून जातात. आंब्याच्या माध्यमातून त्यांचे नाव कायम स्मरणात राहिले तर ते माझ्यासाठी समाधानकारक आहे."

मोदींपासून ते ऐश्वर्या रायपर्यंत...

याआधी शोधलेल्या आंब्याच्या नव्या प्रजातींना पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, सोनिया गांधी, ऐश्वर्या राय, अखिलेश यादव आणि अमित शाह, यांचे नाव देण्यात आल्याचे कलिमुल्ला खान यांनी सांगितले. त्यांना फलोत्पादन क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्कारही देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT