
Bachchu Kadu Amravati : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील भाजपप्रणित महायुती सरकारविरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू केलं.
बच्चू कडू महायुती सरकारच्या धोरणांविरोधात प्रचंड आक्रमक झाले असून, यह बच्चू कडू 'चूप बैठने वाली औलाद नहीं है', असा इशारा देत, येणाऱ्या 14 तारखेला या आंदोलनाचं चित्र बदलणार आहे. भगतसिंग डोक्यात आहे, असा सूचक इशारा दिला आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी गुरूकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीला अभिवादन केलं. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगाना सहा हजार रुपये मानधन, शेतमजूर, मच्छिमारांसह विविध घटकांच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रहारचे शेकडो कार्यकर्ते अन् शेतकरी देखील आंदोलनाला बसले आहेत.
बच्चू कडू यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर यावेळी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "राज्यात जातीपातीचं राजकारण सुरू आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरू आहे. हिरवा, निळा, भगव्यामध्ये लोक विखुरल्या जात आहे. जी हवा देशात सुरू आहे ती बदली गेली पाहिजे". शेतकरी आंदोलनात येण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. पण हा बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी बलिदान करायला तयार आहे, असा इशारा दिला.
भरकटलेली ही व्यवस्था सुधारण्यासाठी हे आंदोलन आहे. माझा बाप मेला तरी बेहत्तर, पण नेता जिवंत राहिला पाहिजे, हे बदलणे गरजेचे आहे. माझा शेतकरी राजा, बाप जिवंत राहिला पाहिजे. सोयाबीनला अगोदर 6 हजारांवर भाव होता, तो आता 4 हजारांवर आणला आहे. कोणी पेटून का उठलं नाही. तुरीचे भाव 1 हजारांनी कमी झाले आहे, याकडे देखील बच्चू कडू यांनी लक्ष वेधले.
देशातील शेतकरी नेते राकेश टिकैत उद्या सोमवारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणार आहे. देशात आता जातीय रंग देण्याचा काम केलं जातं. राज्यात मराठा आणि ओबीसी वाद पेटवला गेला. त्यामुळे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न मागे पडत चालला आहे. आमच्या डोक्यात हिंदू-मुस्लिम टाकलं गेलं आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणजे बच्चू कडूंचे आंदोलन आहे.
'मत विकायला लाडकी बहीण सुरू केली. त्याच वेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडले. सरकारला माहीत आहे. बच्चू कडू मेला तरी फरक पडत नाही. कारण जाती धर्मात लोकांना गुंतवणूक ठेवले आहे. राज्यात आमदाराचा पगार थांबला नाही. कर्मचाऱ्ंयाचा पगार थांबला नाही. पण अपंगांचे पगार सहा-सहा महिने थांबलेत . बच्चू कडू आणि त्यांचा कार्यकर्ता जिवंत आहे. बच्चू कडू चूप बैठने वाली औलाद नहीं है', असा इशारा दिला.
'मी अन्नाचा एक कण खाणार नाही. आता कार्यकर्त्यांनी समोर आलं पाहिजे. सरकारला वाटते की, बच्चू कडू गेला पाहिजे. मरेगाच्या मजुरांचे पगार 200 वरून 250 झाले, आमदारांचे पगार 90 हजारांवरून 3 लाख झाले. केवढी ही तफावत. दिव्यांगांना 1500 रुपयात जगता येते हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. अजित पवार यांना अडीच लाख पगार आहे. खरच त्यांना येवढ्या पगाराची गरज आहे का? येणाऱ्या 14 तारखेला या आंदोलनाचे चित्र बदलणार आहे. 'भगतसिंग' डोक्यात आहे', असा सूचक इशारा बच्चू कडू यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.