
Bihar Politics : केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान बिहार विधानसभा निवडणूक लढविणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले होते. केंद्रीय मंत्रिपद सोडून ते राज्याच्या राजकारणात येणार नाही, असे तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर चिराग यांनी याबाबत रविवारी भरसभेत मोठी घोषणा केली.
पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय पासवान यांनी जाहीर केला आहे. मात्र, मतदारसंघ कोणता असणार याबाबत त्यांनी गुपित ठेवले आहे. मतदारसंघ लोकांनीच ठरवावा, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे. चिराग यांच्या या घोषणेमुळे बिहारच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
बिहारमधील अराह येथील पक्षाने आयोजित केलेल्या सभेत बोलताना चिराग म्हणाले, मी निवडणूक लढणार की नाही, याबाबत प्रत्येकाला उत्सुकता आहे याबाबत घोषणा करतो की, मी निवडणूक लढवणार, सर्व 243 मतदारसंघा लढणार. मी माझ्या लढणार नाही तर बिहारच्या लोकांसाठी लढणार आहे. मी कोणत्या मतदारसंघातून लढायचे, याचा निर्णय तुमच्यावर सोपवतो.
चिराग हे निवडणूक लढवून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत चुरस निर्माण करतील, अशीही चर्चा होती. त्यावही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मला आणखी एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला राहावा, यासाठी मी निवडणूक लढणार आहे. त्याचा फायदा एनडीएला होईल. माझी आघाडी केवळ बिहारच्या जनतेसोबत आहे. एनडीएला अधिक मजबूत करण्यासाठी मी सर्व 243 जागांवर लढेन.
चिराग यांची ही घोषणा एनडीएतील जागावाटपाबाबत महत्वाचे संकेत देत आहे. एनडीएतील भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला प्रत्येकी शंभर जागा हव्या आहेत. तर पासवान यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीतील 100 टक्के स्ट्राईक रेटकडे बोट दाखवत 40 जागांची मागणी केली जात असल्याची चर्चा आहे. इतर छोट्या पक्षांकडूनही सन्मानजनक जागांची मागणी होत आहे.
चिराग पासवान यांनी 2020 ची निवडणूक कुणाशीही आघाडी न करता लढविली होती. या निवडणुकीत यांच्या पक्षाला 5.66 टक्के मते मिळाली होती. संयुक्त जनता दलाच्या जागा कमी करण्यात त्यांच्या पक्षाचा वाटा मोठा होता, असे आकडेवारीवरून स्पष्ट झाले होते. नितीश कुमार यांना केवळ 43 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.