मुरादाबाद: उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली रामपूर येथील व्यापारी शहजाद याला मुरादाबाद येथून अटक केली आहे.
अटक करण्यात आलेला शहजाद हा पाकिस्तान-भारतामध्ये कॉस्मेटिक, कपडे, मसाल्यांचा अवैध व्यावसाय करीत होता. व्यवसायाच्या नावाखाली तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएआयसाठीही काम करीत होता, अशी माहिती समोर येत आहे.
भारत-पाकिस्तान रेषेजवळ एक व्यक्ती तस्करी करीत असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली. शहजाद याला पाकिस्तानी एजन्सी ISIचे संरक्षण मिळत होते. तो देश-विदेशी कारवायामध्ये सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो रामपूर येथील रहिवासी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहजाद पाकिस्तानात जात होता. सीमेपलीकडे भारत आणि पाकिस्तानदरम्यान गुप्तपणे सौंदर्यप्रसाधने, कपडे, मसाले आणि इतर वस्तूंचा व्यापार करीत होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटांच्या संपर्कात शहजाद होता. तो त्यांच्यासाठी काम करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.
भारताच्या सुरक्षेशी संबंधित गुप्तचर माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंटांना शहजादने दिली असल्याची पोलिसांना प्राथमिक माहिती आहे. लखनौ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून शहजाद अनेकदा भारतातील आपल्या एजंटांना पैसे पुरवत होता, असेही एटीएसच्या तपासात आढळले आहे.
व्यवसायाच्या निमित्ताने तो रामपूर आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागातून लोकांना आयएसआयसाठी काम करण्यासाठी पाकिस्तानला पाठवत असे. त्याच्यासाठी व्हिसाची व्यवस्थाही पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंटांनी केली होती. भारताविरोधात हेरगिरी करण्यासाठी शहजादने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटांना भारतीय सिम कार्डही पुरवले असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.