Mahakumbha Mela Sarkarnama
देश

UP New District : केवळ 4 महिन्यांसाठी नवीन जिल्ह्याची निर्मिती; 4 तहसील, 67 गावे... काय आहे कारण?

Yogi Government Announces New District for Prayagraj Mahakumbh: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी योगी सरकारने स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा केली आहे.

Rajanand More

Uttar Pradesh News : प्रयागराजमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. भाविकांच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज सुलभपणे व्हावे यासाठी योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने रविवारी केवळ चार महिन्यांसाठी नवीन जिल्ह्याची निर्मिती केली आहे. महाकुंभ मेळा असे या अस्थायी जिल्ह्याला नाव देण्यात आले आहे.

नवीन जिल्ह्यामध्ये चार तहसील आणि 67 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांप्रमाणेच प्रशासकीय कामकाज चालणार आहे. कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासकीय पातळीवर योग्यप्रकारे निर्णय घेण्यासाठी या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी पोलिस चौक्या आणि पोलिस ठाणे उभारण्यात येणार आहेत.

प्रगागराजचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार माँदड यांनी रविवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे. महाकुंभ मेळा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक अशी सर्व प्रमुख पदे इतर जिल्ह्यांप्रमाणेच असणार आहेत. जिल्ह्यात महाकुंभ मेळा पुढील वर्षी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधी होणार आहे. मेळ्यामध्ये सहा शाही स्नान होणार आहे. देश-विदेशातून तब्बल 40 कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, जिल्हा निर्मितीचे अधिकार राज्य सरकारकडे असतात. नवीन जिल्ह्यासाठी सरकारला राजपत्र जारी करावे लागते. त्यासाठी विधानसभेत कायदा पारित करावा लागतो किंवा राजपत्र जारी केल्यानंतर नवीन जिल्हा अस्तित्वात येऊ शकतो. राज्य सरकार जिल्ह्याचे नावही बदलू शकते. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा दर्जाही काढला जाऊ शकतो.

उत्तर प्रदेशात निर्मिती करण्यात आलेल्या महाकुंभ मेळा हा जिल्हा केवळ चार महिन्यांसाठी असेल. महाकुंभ मेळा प्रयागराज जिल्ह्यात असून याच जिल्ह्यांतील काही भाग नवीन जिल्ह्याला जोडण्यात आला आहे. मेळा संपल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्रयागराज जिल्ह्यामध्ये या गावांचा समावेश होईल.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT