Haldwani Gang Rape Case | ABVP Candidate Arrested Sarkarnama
देश

Haldwani Case : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; ABVP च्या माजी उमेदवारासह चौघांना अटक

ABVP Candidate Arrested : धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाच्या तपासादरम्यान हॉटेलमध्ये येणाऱ्या व्यक्तींची ओळखपत्रे तपासल्याशिवाय त्यांना खोल्या दिल्या जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून, हे हॉटेल सील केले आहे.

Jagdish Patil

Haldwani Gang Rape Case : उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यापैकी एकाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) उमेदवारीवर महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी धीरज बिश्त, नितीन पाल, अंश खत्री आणि हिमांशू गौनी या चार आरोपींना अटक केली आहे. यापैकी धीरज बिश्त याने दोन वर्षांपूर्वी एबीव्हीपीचा उमेदवार म्हणून हल्द्वानीतील एका महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती.

दरम्यान, या घटनेनंतर एबीव्हीपीने धीरज बिश्तपासून अंतर राखले आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने निष्पक्ष तपासाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या घटनेची माहिती समोर येताच एबीव्हीपीने निवेदन प्रसिद्ध करून घटनेचा तीव्र निषेध केला.

तसेच, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय, धीरज बिश्त हा पूर्वी संघटनेच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदाचा उमेदवार होता. मात्र, सध्या त्याच्याकडे संघटनेत कोणतीही जबाबदारी नसल्याचेही एबीव्हीपीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान हॉटेलमध्ये येणाऱ्या व्यक्तींची ओळखपत्रे तपासल्याशिवाय त्यांना खोल्या दिल्या जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून, हे हॉटेल सील केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT