Kanhalgaon Sanctuary : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना घोषित केलेलं अभयारण्य रद्द करण्याची सुधीर मुनगंटीवारांची फडणवीसांकडे मागणी

Sudhir Mungantiwar on Kanhalgaon Sanctuary : कन्हाळगाव अभयारण्याला स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा विरोध असतानाही मुंबईतील काही पर्यावरणवादी त्याच्या निर्मितीसाठी आग्रही असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला.
Kanhalgaon Sanctuary | Sudhir Mungantiwar
Kanhalgaon Sanctuary | Sudhir MungantiwarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kanhalgaon Sanctuary : चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य रद्द करण्याची मागणी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं. विशेष म्हणजे, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2020 मध्ये घोषित केलेल्या या अभयारण्याला मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे.

तसेच, या अभयारण्याच्या निर्मितीसाठी आग्रही असलेल्या मुंबईतील तथाकथित पर्यावरणवाद्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 31 हजार हेक्टर वनक्षेत्रावर कन्हाळगाव अभयारण्य प्रस्तावित आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन वनमंत्री यांच्या काळात 2020 मध्ये या अभयारण्याची घोषणा करण्यात आली होती.

मात्र, त्यापूर्वी 2014 ते 2019 या कालावधीत वनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन या अभयारण्याला मान्यता दिली नव्हती. आता हे अभयारण्य रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कन्हाळगावचा परिसर ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि कावल व्याघ्र प्रकल्प यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या टायगर कॉरिडॉरचा भाग आहे. या जंगलात समृद्ध जैवविविधता असून, सध्या या परिसरात अंदाजे 22 ते 32 वाघांचा अधिवास असल्याचं सांगितलं जातं.

Kanhalgaon Sanctuary | Sudhir Mungantiwar
Congress MLA Viral Video : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदाराचा राडा; स्टेजवरूनच माईक फेकला, कर्मचाऱ्याला मारायला धावले...

त्यामुळे वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा परिसर महत्त्वाचा मानला जातो. मात्र, अभयारण्य घोषित झाल्यास जंगलावर अवलंबून असलेल्या स्थानिक नागरिकांच्या रोजगारावर आणि पारंपरिक हक्कांवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली आहे.

Kanhalgaon Sanctuary | Sudhir Mungantiwar
Shalarth ID Scam : शिक्षकांना मोठा धक्का; जुना पगार मिळणार नाही : 80 कोंटीच्या थकीत वेतनाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

दरम्यान, या अभयारण्याला स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा विरोध असतानाही मुंबईतील काही पर्यावरणवादी त्याच्या निर्मितीसाठी आग्रही असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. जंगल आणि स्थानिकांच्या प्रश्नांबाबत भूमिका घेताना पर्यावरणवाद्यांकडून दुजाभाव केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. उद्योगांसाठी जंगलतोड केली जाते, त्यावेळी हेच पर्यावरणवादी तोंडाला फेविकॉल लावून गप्प बसतात, असं म्हणत त्यांनी या पर्यावरणवाद्यांवर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.