V. D. Satheesan takes oath in the presence of Rahul Gandhi and leaders from multiple political parties during a historic ceremony in Kerala. Custom URL: Sarkarnama
देश

CM oath ceremony : राहुल गांधींसोबत भाजपचे नेते; सतीशन यांनी शपथविधी केला ऐतिहासिक, 64 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

VD Satheesan swearing in, Kerala CM oath ceremony : सतीशन यांच्यासोबत २० मंत्र्‍यांनीही शपथ घेतली. केरळमध्ये तब्बल ६४ वर्षांनंतर असे पहिल्यांदाच घडले आहे.

Rajanand More

Kerala political news : केरळच्या मुख्यमंत्रि‍पदी काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन विराजमान झाले. त्यांच्यासह सोमवारी २० नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. आजचा शपथविधी सोहळा अनेक अर्थांनी आगळावेगळा ठरला आहे. सतीशन यांच्या प्रयत्नातूनच या सोहळ्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाल्याची चर्चा आहे. सुरूवातीला मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून मागे पडलेल्या सतीशन यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.

केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूनायडेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) ची दहा वर्षांनंतर सत्ता आली असून सतीशन हे सरकारचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

शपथविधी सोहळा म्हटले की, अनेकदा राज्यात सत्ता आलेल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्याच नेत्यांची रेलचेल पाहायला मिळते. पण आजच्या शपथविधी सोहळ्यात आगळेवेगळे चित्र होते. सतीशन यांच्या शपथविधीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत माजी मुख्यमंत्री पी. विजयन, केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांच्यासह विरोधी पक्षातील आणखी काही नेते उपस्थित होते. खुद्द सतीशन यांनीच या नेत्यांना आमंत्रित केले होते. सर्व राजकीय पक्षांना सोबत घेत सतीशन यांनी हा सोहळा अविस्मरणीय केला.

एवढेच नाही तर सतीशन यांच्यासोबत २० मंत्र्‍यांनीही शपथ घेतली. केरळमध्ये तब्बल ६४ वर्षांनंतर असे पहिल्यांदाच घडले आहे. १९६२ नंतर पहिल्यांदाच संपूर्ण कॅबिनेटने शपथ घेतली. ६४ वर्षांपूर्वी काँग्रेसचे तिसरे मुख्यमंत्री आर. शंकर यांच्यासह संपूर्ण कॅबिनेटने शपथ घेतली होती. त्यानंतर राज्यात सातत्याने कधी काँग्रेस तर कधी डाव्यांची सत्ता येत गेली. पण एकदाही मुख्यमंत्री आणि संपूर्ण कॅबिनेटचा एकत्रित शपथविधी झाला नव्हता.

सतीशन यांच्या प्रयत्नांमुळे आज एकत्रित शपथविधी झाल्याची चर्चा आहे. यूडीएफमध्ये काँग्रेस आणि इंडियन यूनियन मुस्लिम लीगसह आणखी काही छोटे पक्षही आहेत. या सर्व पक्षांना विश्वास घेत सरकार चालविण्याचा सूचक संदेश सतीशन यांनी यानिमित्ताने दिला आहे. एवढेच नाही तर भाजप व डाव्या पक्षांनाही शपथविधी सोहळ्याला वैयक्तिक फोन करून, भेटून आमंत्रित करण्याच्या त्यांच्या भूमिकेचेही कौतुक होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT