Parliament Winter Session  Sarkarnaam
देश

Parliament Winter Session : हरयाणा, महाराष्ट्रातील विजयाने मोदी सरकारचा कॉन्फिडन्स वाढला; संसदेत 'एक देश एक निवडणूक' विधेयक आणणार

Political News : 'एक देश एक निवडणूक' विधेयक सरकार यांच अधिवेशन काळात आणण्याची शक्यता आहे. हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले जाण्याची शक्यता आहे.

Sachin Waghmare

New Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार 'एक देश एक निवडणूक' विधेयक सादर करणार आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरु आहेत. 'एक देश एक निवडणूक' विधेयक सरकार यांच अधिवेशन काळात आणण्याची शक्यता आहे. हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) कडे पाठवले जाण्याची शक्यता आहे. (Parliament Winter Session News )

'एक देश एक निवडणूक' या विषयावरील रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून सरकारला या विधेयकावर एकमत हवे आहे. संयुक्त संसदीय समिती सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. त्यासोबाबतच देशभरातील विचारवंत लोकांसोबतच सर्वसामान्यांचेही मते याबाबत जाणून घेतले जाणार असल्याचे समजते.

'एक देश एका निवडणुकी'चे फायदे आणि ती आयोजित करण्याच्या पद्धतींबद्दल तपशीलवार चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनातच (Parliament Winter Session) हे विधेयक सरकार सादर करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजते. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या हरयाणा, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपचा (Bjp) कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. त्यामुळे येत्या काळात प्रलंबित असलेले विधयके मंजूर करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT