नेपाळमध्ये सध्या अराजक माजलं असून इथं जनरेशन झेडच्या तरुणाईनं देश अस्थिर करुन टाकला आहे. सगळीकडं जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. इथली कायदा-सुव्यवस्था हाताबाहेर गेल्यानं इथल्या पंतप्रधानांना देखील राजीनामा देणं भाग पडलं आहे. तर पोलिसांच्या गोळीबारात २४ तरुणांचा जीवही गेला आहे.
भारतीय माध्यमांनी नेपाळच्या गृहयुद्धाची धग टीव्हीवरुन आणि वर्तमानपत्रातून दाखवून दिलीच आहे. पण इथल्या भीषण परिस्थितीला प्रत्यक्ष सामोरं गेलंय अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथलं एक कुटुंब. या कुटुंबाची गाडी इथल्या आंदोलकांनी पेटवून दिली, हा भयानक अनुभव कोपरगावच्या काली प्रसाद यांनी एएनआयशी बोलताना शेअर केला आहे.
काली प्रसाद म्हणतात, "नेपाळला आम्ही ८ सप्टेंबर रोजी पशुपतीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो. या ठिकाणच्या जडीबुटी चौकात आमची गाडी इथल्या आंदोलकांनी जाळून टाकली. या चौकात जाण्यापूर्वीच आम्हाला काही लोकांनी सांगितलं की, तुम्ही दर्शनासाठी आला आहात तर पुढे जाऊ शकता. त्यामुळं आम्ही पुढे आलो, त्यानंतर जडीबुटी चौकात आम्ही पोहोचलो तर काही लोकांनी आमची गाडी थांबवली आणि आम्हाला त्यांनी गाडीतून बाहेर काढलं तसंच आमची गाडी पेटवून दिली.
यावेळी काही स्थानिक नेपाळी लोकांनी आम्हाला बाजुला केलं आणि थोड्यावेळ आमच्यासोबत तिथंच थांबले. या भीषण घटनेनंतर आज आम्ही इथं विमानतळावर आलो आहोत. आम्हाला इथं खूपच भयानक त्रासाला सामोरं जावं लागलं. आता आम्ही परत निघालो आहोत"
दरम्यान, नेपाळमध्ये गेल्या पाच दिवसांपूर्वी भडकलेल्या या हिंसक आंदोलनामध्ये तरुणांनी आत्तापर्यंत इथली संसद, सुप्रीम कोर्ट, अनेक मंत्र्यांची घरं, तसंच सार्वजनिक इमारती पेटवून दिल्या आहेत. तर काही मंत्र्यांना त्यांनी रस्त्यावर पळवून मारतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. इथल्या पंतप्रधानांना यामुळं सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. तर राष्ट्रपतींनीही राजीनामा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.