Vijay Wadettiwar Sarkarnama
देश

Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांना दिल्लीत मिळाले नाही शासकीय वाहन, अखेर...

Mayur Ratnaparkhe

Maharashtra opposition leader Vijay Wadettiwar got a rental car : महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देशाची राजधानी दिल्लीत शासकीय वाहन उपलब्ध न झाल्याने, चक्क भाड्याच्या गाडीतून प्रवास करावा लागला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रशासनाने वडेट्टीवार यांना घेण्यासाठी भाड्याची गाडी पाठवल्याचे समोर आले आहे. ज्यावरून वडेट्टीवार यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

राजशिष्टचारामधे मुख्यमंत्री यांच्या खालोखाल विरोधी पक्षनेते हे पद येत, मात्र आज त्यांनाच सरकारी गाडी मिळाली नाही. सरकारी गाडी न दिल्याने वडेट्टीवार चांगलेच नाराज झाले आहेत. तर विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांचा दौरा उशीरा आल्याने त्यांना गाडी देता आली नसल्याचं महाराष्ट्र सदन प्रशासनाचं म्हणणं आहे.

सोबतच, महाराष्ट्र सदनात काही न्यायमूर्ती असल्याने त्यांना गाड्या दिल्याने वडेट्टीवार यांना गाडी देता आली नसल्याची सदन प्रशासनाची माहिती आहे. पण संविधनिक पदावर असलेल्या व्यक्तीला अशी भाड्याची गाडीदिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल जात आहे.

या आधी जुलै महिन्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला तेव्हा सुद्धा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना या पावसाचा फटका बसल्याचं समोर आलं होतं. जोरदार पावसामुळे विजय वडेट्टीवार यांच्या प्रचिती गड या शासकीय निवासस्थानाला गळती लागल्याचा प्रकार समोर आला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT