Video Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेत्याच्या शासकीय निवासस्थानाला गळती, वडेट्टीवार सरकारवर बरसले...

Leakage at Vijay Wadettiwars Govt residence : पावसामुळे विजय वडेट्टीवार यांच्या प्रचिती गड या शासकीय निवासस्थानाला गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाय पावसाचा जोर एवढा आहे की, त्यांच्या घरातील बल्ब आणि पंख्यातून पाणी गळत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 18 July : राज्यभरातील अनेक शहरांमध्ये गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. अचनाक पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. कामावर जाणाऱ्या लोकांना या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

पावसामुळे सर्वसामान्यांचे हाल होणं काही नवीन नाही. मात्र, आता खुद्द राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देखील या पावसाचा फटका बसल्याचं समोर आलं आहे. जोरदार पावसामुळे विजय वडेट्टीवार यांच्या प्रचिती गड या शासकीय निवासस्थानाला गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे. (Leakage at Vijay Wadettiwar Govt residence)

शिवाय पावसाचा जोर एवढा आहे की, त्यांच्या घरातील बल्ब आणि पंख्यातून पाणी गळत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आता पावसाचा फटका थेट नेत्यांना बसल्याचं पाहायला मिळत आहे. वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या शासकीय निवास्थानाला गळती लागल्यामुळे आता कोट्यवधी रुपये नेत्यांच्या निवास्थानाच्या डागडुजीसाठी घालवले जातात.

Vijay Wadettiwar
Video Sanjay Raut : 'लाडक्या बहिणीला 10 हजार रुपये द्या! दीड हजारांत तिचे घर चालेल का?

मात्र, तरीही अशा घरांना गळती कशी लागते? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर या घराला लागलेल्या गळतीप्रमाणे महायुती (Mahayuti) सरकारलाही गळती लागली असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच हे सरकार आता पुरात वाहून जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

Vijay Wadettiwar
Marathi Language Elite Status: पवारांनी चिमटा काढल्यानंतर CM शिंदे लागले कामाला; 'मराठी'ला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार?

शासकीय निवासस्थानाला गळती कशी लागली आणि दुरुस्तीसाठी आपण काही पाठपुरवठा केला आहे का? असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांना विचारला असता ते म्हणाले, "आम्ही याबाबत सरकारला कळवलं आहे. मात्र, याकडे कुणाचंच लक्ष नाही. यांचं लक्ष फक्त टेंडर काढणं आणि कमिशन खाण्याकडे आहे. या गळतीप्रमाणे सरकारलाही गळती लागली आहे." अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com