Congress Politics : विजय वडेट्टीवार अन् प्रतिभा धानोरकरांचा वाद थेट दिल्ली दरबारात

Congress Politics Vijay Wadettiwar And Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यात निर्माण झालेल्या वाद पुन्हा एकदा ऐन विधानसभेच्या तोंडावर उफाळून आला आहे.
Vijay Wadettiwar and MP Pratibha Dhanorkar
Vijay Wadettiwar and MP Pratibha DhanorkarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 14 Sep : चंद्रपूर लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस (Congress) खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यात निर्माण झालेल्या वाद पुन्हा एकदा ऐन विधानसभेच्या तोंडावर उफाळून आला आहे.

राज्यातील पदाधिकाऱ्यांना दोघेही जुमानत नसल्याने आता केंद्रीय नेतृत्वाला दखल घ्यावी लागली असून दोघांनाही दिल्लीत बोलवण्यात आलं आहे. हा वाद लगेच क्षमला नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत वडेट्टीवारांचा ‘विजय' धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर दोघेही मूळचे शिवसैनिक आहेत. धानोरकर यांना शिवसेनेतून वडेट्टीवार यांनीच काँग्रेसमध्ये आणलं. लोकसभेची उमेदवारी दिली. 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकच खासदार निवडून आला होता. त्यात एकमेव धानोरकर हे होते.

मात्र, दोघेही काँग्रेसमध्ये आल्यानंतर चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून त्यांच्यात बिनसले. अशातच बाळू धानोरकर यांचे अकाली निधन झाले. प्रतिभा धानोरकर या आमदार असल्याने चंद्रपूर लोकसभा मतदासंघात आपल्या मुलीली उतरवण्याचे नियोजन वडेट्टीवार यांनी केले होते. 2024 च्या संभाव्य उमेदवार म्हणून शिवानी वडेट्टीवार यांचे आघाडीवर होते.

चंद्रपूर जिल्ह्यात 'पोस्टर वॉर'

मात्र, या दरम्यान प्रतिभा धानोरकर यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. हा आपला मतदारसंघ असल्याचा दावा केल्याने वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्ह्यात 'पोस्टर वॉर' रंगले होते. सोशल मीडियावर एकमेकांवर टीकाटीप्पणी केली जात होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रतिभा धानोरकर यांना पसंती दिली.

Vijay Wadettiwar and MP Pratibha Dhanorkar
Devendra Fadnavis : एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली तारीख

त्यामुळे वडेट्टीवारांचा नाईलाज झाला. ते शांत झाले. धानोरकर विजयी झाल्यानंतर हा वाद संपेल असे सर्वांना वाटत होते. मात्र, अंतर्गत धुसफूस सुरूच होती. या दरम्यान वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाच्या कार्यक्रमात प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्या एका वक्तव्यावरून पुन्हा वादाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही अल्पसंख्यक आपल्यावर राज्य करीत आहेत. आता परिवर्तनाची वेळ आली असे सांगून धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचे आवाहन या मेळाव्यातून केले.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धानोरकर यांच्या विधानाने काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. वडेट्टीवार यांनी वरिष्ठ नेत्यांकडे याची तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या वादाला विदर्भातील काही नेते बडे नेते हवा देत असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विजय वडेट्टीवार हे एकमेकांच्या विरोधात उघडपणे बोलत नाही. एवढेच नव्हे तर एकमेकांचा उल्लेख करणेही टाळतात. असे असले तरी दोघांमधील शितयुद्ध कोणापासून लपून राहिलेले नाही.

प्रदेशाध्यक्ष या नात्याने पटोले यांनी धानोरकर यांना समज देणे अपेक्षित होते. मात्र ते अद्याप यावर काहीच बोलले नाही. धानोरकर यांचे चंद्रपूरमधील वाढते राजकीय वर्चस्व वडेट्टीवार यांना सुरुवातीपासूनच खटकत आहे. त्यात ब्रम्हपुरीमध्ये धानोकर यांनी केलेल्या आवहानाचा फटका विधानसभेत बसण्याची भीती वडेट्टीवारांना वाटत आहे.

Vijay Wadettiwar and MP Pratibha Dhanorkar
Eknath Shinde : निवडणुकांच्या तोंडावर शिंदे सरकारनं चालवलं 'मराठी कार्ड'

या सर्व वादावर लगेच तोडगा काढावा यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. काँग्रेसचे संघटक सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथाला यांच्याकडे त्यांनी हा वाद नेला आहे. या दोन्ही नेत्यांनी वडेट्टीवार व धानोरकर यांना दिल्लीत बोलावले आहे. हा वाद काँग्रेस आणि स्थानिक नेते कसे हाताळतात यावरच वडेट्टीवारांचा ‘विजय' अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com