Pallavi Joshi On The Kashmir Files latest news sarkarnama
देश

The Kashmir Files वर नवी ठिणगी ; राजकीय अजेंड्यासाठी वापर..; दोन मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये जुंपली

Pallavi Joshi On The Kashmir Files: "काश्मीरबद्दल जुने, खोटे आणि विकृत कथन टिकवून ठेवण्याच्या राजकीय अजेंड्यासाठी हे सर्जनशील व्यासपीठ वापरले गेले हे खूप दुर्दैवी आहे.

सरकारनामा ब्युरो

Pallavi Joshi On The Kashmir Files:'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा या वर्षींच्या सुरवातीला प्रदर्शित झाला. तेव्हापासून तो वादात (The Kashmir Files Controversy) सापडला. आता पुन्हा एकदा या सिनेमाच्या जुन्या वादावर नवी ठिगणी पडली आहे. गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये (International Film Festival) नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

ज्यूरी प्रमुख आणि इस्त्राईल चित्रपट निर्माते नदाव लॅपिड ( Israeli filmmaker Nadav Lapid) यांनी या बहुचर्चित सिनेमावर वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला आहे. दोन मराठी अभिनेत्री एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.

नव्वदच्या दशकातील काश्मिरी पंडीतांच्या नरसंहाची कहाणी म्हणजे 'द कश्मीर फाइल्स'. विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आदी कलाकार आहेत. सध्या या सिनेमावरुन पुन्हा समाज माध्यमांवर नेटकऱ्यांमध्ये जुंपली आहे त्याला कारण आहे गोव्यात झालेल्या ५३ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये नदाव लॅपिड यांनी केललं विधान.

प्रपोगांडा,वल्गर सिनेमा ?

नदाव लॅपिड यांनी या सिनेमाला प्रपोगांडा (Propaganda) आणि वल्गर सिनेमा म्हटलं आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल सारख्या नामांकीत सिनेमाच्या यादित यासारख्या सिनेमाचं नामांकन होणं अयोग्य असल्याचे नदाव लॅपिड यांनी सांगितले. त्यांचे पडसाद उमटायला लागले आहेत. अभिनेता अनुपम खेर आणि सहकलाकार दर्शन कुमार, पल्लवी जोशी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आंतरराष्ट्रीय समुदाय आतापर्यंत मौन..

या सिनेमाची निर्माती म्हणून अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी सविस्तर मत व्यक्त केलं आहे. तिच्या या निवेदनावर उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. "काश्मिरी पंडित समाज अनेक दशकांपासून ज्या यातना भोगत होता त्यावर आंतरराष्ट्रीय समुदाय आतापर्यंत मौन बाळगून होता. ३ दशकांनंतर भारतीय चित्रपट इंडस्ट्रीला शेवटी कळले की भारताची कहाणी खरेपणाने आणि वस्तुनिष्ठपणे सांगण्याची गरज आहे," असे पल्लवी यांनी म्हटलं आहे.

हा नेहमीच लोकांचा चित्रपट राहील -पल्लवी जोशी

"काश्मीरबद्दल जुने, खोटे आणि विकृत कथन टिकवून ठेवण्याच्या राजकीय अजेंड्यासाठी हे सर्जनशील व्यासपीठ वापरले गेले हे खूप दुर्दैवी आहे. नरसंहार नाकारणाऱ्याच्या उद्धट आणि असभ्य विधानांविरुद्ध द कश्मीर फाइल्सचा बचाव करण्यासाठी भारतातील लोक ज्याप्रकारे उभे राहिले ते पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. मी आमच्या प्रेक्षक आणि समर्थकांना खात्री देऊ इच्छिते की 'द कश्मीर फाइल्स' हा नेहमीच लोकांचा चित्रपट राहील,' असे खडे बोल पल्लवी जोशी यांनी नदाव लॅपिड यांना सुनावले आहे.

लॅपिड यांच्या वक्तव्याचे स्वरा भास्करकडून समर्थन

नदाव लॅपिड त्यांच्या या विधानावर टीका होत असताना अभिनेत्री स्वरा भास्कर हिने लॅपिड यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तिनं याबाबत एक ट्विट केले आहे. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाला तिने वारंवार विरोध केला होता. स्वरा भास्कर हिने ट्विटमध्ये ज्युरी हेड नदव लॅपिड यांच्या वक्तव्याची बातमी शेअर करत लिहिले की, "जगासमोर सत्य आले आहे!"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT