Waqf Amendment Bill Sarkarnama
देश

Waqf Bill Latest Bill : मोठी बातमी : वक्फ विधेयक मंजूर, JPC ने विरोधकांच्या सर्व शिफारशी फेटाळल्या

Joint Parliamentary Committee Meeting Waqf Board Amendments : संयुक्त संसदीय समितीमध्ये 14 शिफारशींवर चर्चा झाली.  

Rajanand More

Waqf Bill Passed: वक्फ संशोधन विधेयकावर संयुक्त संसदीय समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत 44 कलमांमध्ये सुधारणांवर चर्चा करण्यात आली. समितीतील एनडीएच्या सदस्यांनी सादर केलेल्या सर्व सुधारणा समितीकडून स्वीकारण्यात आल्या. तर विरोधी खासदारांनी सुचवलेली एकही सुधारणा मान्य करण्यात आली नाही.

समितीने विधेयकाला सोमवारी मंजुरी दिली. त्यासाठी समितीमध्ये आज मतदान झाले. सुधारणांच्या बाजूने 16 सत्ताधारी खासदारांनी तर विरोधात 10 खासदारांनी मतदान केले. विरोधी खासदारांनी विधेयकातील 44 कलमांवर आक्षेप घेतला होता. त्यावर जेपीसीमध्ये चर्चा झाली. पण या सुधारणा मान्य करण्यात आल्या नाहीत.      

भाजपचे खासदार जगदंबिका पाल हे समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी सांगितले की, एनडीएच्या खासदारांनी सादर केलेल्या 14 सुधारणा स्वीकारण्यात आल्या आहेत. तर विरोधी खासदारांनी सादर केलेल्या सर्व सुधारणा फेटाळण्यात आल्या. प्रत्येक सुधारणांवर स्वतंत्र मतदान झाले. आज समितीची शेवटची बैठक होती. जेपीसीचा अंतिम अहवाल 28 जानेवारी रोजी सर्व सदस्यांना दिला दिला जाईल. त्यानंतर 29 जानेवारीला अधिकृतपणे स्वीकारला जाईल.

बैठकीनंतर बोलताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, त्यांनी जे आधीच ठरवले होते, तेच केले. त्यांनी आम्हाला बोलण्यासाठीही वेळ दिला नाही. कोणत्याही नियमांचे किंवा प्रक्रियांचे पालन करण्यात आले नाही, असा आरोप बॅनर्जी यांनी केला.

विधेयकावर सुरूवातीपासून वाद

वक्फ संशोधन विधेयक 8 ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर करण्यात आले होते. त्याला विरोधकांनी जोरदार विरोध केल्यानंतर संयुक्त संसदीय समितीकडे विधेयक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विधेयकातील प्रस्तावित सुधारणांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. तर या विधेयकामुळे वक्फ बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता येईल, असा दावा सत्ताधारी खासदारांनी का होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT