Rahul Gandhi, Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : आम्हाला सोडून गेला तर प्रियांका..! राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर वायनाडमध्ये पोस्टर

Lok Sabha Election 2024 Result Wayanad Constituency Priyanka Gandhi Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

Rajanand More

Wayanad : लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पण दुसरीकडे पक्षाचे नेते राहुल गांधी द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. निवडणुकीत त्यांनी केरळातील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

राहुल यांना आता एका मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. ते वायनाडला रामराम करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसे संकेत वायनाडमधील नेत्यांकडूनच मिळत आहेत. त्यामुळे त्यांनी वायनाड सोडू नये, अशी विनंती कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

वायनाड सोडून राहुल गांधी रायबरेलीला पसंती देणार असल्याच्या चर्चेनंतर कार्यकर्त्यांकडून पोस्टर झळकावण्यात आले. राहुलजी, ‘कृपया आम्हाला सोडून जाऊ नका. जावेच लागले तर बहीण प्रियांका गांधींना आमची काळजी घ्यायला सांगा’, असे या पोस्टरवर लिहिले आहे.

पोस्टरमुळे चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे राहुल वायनाड सोडणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्याजागी पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी काँग्रेसच्या उमेदवार असतील, याचेही संकेत या पोस्टरवरून मिळाले आहेत. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यानही प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत सूचक विधान केले होते.

दरम्यान, राहुल गांधी बुधवारी वायनाडमधील मलप्पुरम येथे मतदारांचे आभार मानण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपली द्विधा मनस्थिती झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, वायनाड की रायबरेलीला पसंती द्यायची, या द्विधा मनस्थितीत मी आहे. पण माझ्या निर्णयाने दोन्ही मतदारसंघ खूष होतील, हे आश्वास देतो.

राहुल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. नरेंद्र मोदींचे परमात्मा त्यांना अंबानी आणि अदानी यांच्या बाजून सर्व निर्णय घेण्यास सांगतात. माझ्याकडे ही सुविधा नाही. भारतातील गरीब लोक, वायनाडमधीलल लोक माझ्यासाठी देव आहेत. हीच लोकं मी काय करायचं, ते सांगतात, असा निशाणा राहुल यांनी साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT