Pema Khandu : भाजपचा पेमा खांडू यांच्यावरच भरवसा; गुरूवारी घेणार CM पदाची शपथ...

Arunachal Pradesh CM Pema Khandu BJP : भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
Pema Khandu, Narendra Modi
Pema Khandu, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावरही भरवसा ठेवला आहे. पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत बुधवारी खांडू यांची नेतेपदी निवड करण्यात आली.

भाजपचे नेते रविशंकर प्रसाद आणि तरुण चुघ हे अरुणाचल प्रदेशमध्ये केंद्रीय निरीक्षक होते. त्यांच्या उपस्थितीत संसदीय दलाची बैठक झाली. या बैठकीत सर्व आमदारांनी खांडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे अरुणाचलमध्ये पुन्हा एकदा खांडू यांचे राज्य येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pema Khandu, Narendra Modi
Odisha CM Oath Ceremony : नवीनबाबूंच्या स्वागतासाठी शाहांनी खुर्ची सोडली; गडकरींसह चार केंद्रीय मंत्री उभे...

खांडू गुरूवारी सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. भाजपला राज्यात 60 पैकी 46 जागांवर विजय मिळाला आहे. मागील निवडणुकीपेक्षा तीन जागा जास्त मिळवत भाजपने पुन्हा दोन तृतियांश बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. अरुणाचलमध्ये भाजपने पहिल्यांदाच सलग सत्ता मिळवली आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजपला दोन्ही जागांवर विजय मिळाला आहे.

राष्ट्रवादीचा पाठिंबा

अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहे. राष्ट्रवादीने या निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी आघाडी केली नव्हती. सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे नॅशनल पीपल्स पार्टीने भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सरकारीची आणखी बळकट झाले आहे.

Pema Khandu, Narendra Modi
Odisha CM Oath Ceremony : नवीनबाबूंच्या स्वागतासाठी शाहांनी खुर्ची सोडली; गडकरींसह चार केंद्रीय मंत्री उभे...

दरम्यान, पेमा खांडू हे 2016 पासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. नबाम तुकी यांच्यानंतर ते काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री बनले होते. पण काँग्रेस आमदारांना फोडत त्यांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा मुख्यमंत्री बनले. काही महिन्यांतच त्यांना पक्षातून काढण्यात आले. पुन्हा खांडू यांनी समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करत सत्ता काबीज केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com