Priyanka Gandhi, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Priyanka Gandhi Won : प्रियांका गांधींनी पहिल्याच निवडणुकीत राहुल गांधींना टाकले मागे; केला ‘हा’ विक्रम

Waynad Lok Sabha Constituency Bypoll Congress Rahul Gandhi : राहुल गांधींनी राजीनामा दिल्यामुळे वायनाड मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक झाली.

Rajanand More

Bypoll Result 2024 : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्या पहिल्या निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी चार लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवत बंधू राहुल गांधींचा मताधिक्याचा विक्रम मोडला आहे.

राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्यासमोर कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सत्येन मोकेरी आणि भाजपच्या उमेदवार नव्या हरिदास यांचे आव्हान होते. यंदा मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने प्रियांका यांचे मताधिक्यही कमी असेल, अशी चर्चा होती.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच प्रियांका यांनी मोठी आघाडी घेतली. ही आघाडी एकाही फेरीत कमी झाली नाही. त्यांना तब्बल 6 लाख 22 हजार 338 मते मिळाली असून तब्बल 4 लाख 10 हजार 931 मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. मोकेरी यांना 2 लाख 11 हजार आणि नव्या यांना 1 लाख 10 हजार मते मिळाली आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत 3.65 लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. पण यावेळी मतदानाची टक्केवारी कमी असूनही प्रियांका गांधींनी मोठे मताधिक्य मिळवले आहे. त्यामुळे मतदारांनी राहुल यांच्यापेक्षा प्रियांका गांधींना अधिक पसंती दिल्याचे दिसते.

राहुल गांधींनीही प्रियांका गांधींचा जोरकसपणे प्रचार केला होता. आपल्यापेक्षा आपली बहीण अधिक चांगले काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, आता संसदेत गांधी कुटुंबातील तीन सदस्य असणार आहेत. सोनिया गांधी या राज्यसभेच्या सदस्य असून राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते लोकसभेचे विरोधी पक्षनेतेही आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT