H D Kumaraswamy Sarkarnama
देश

Karnataka Politics : शेजारील राज्यातही अजित पवार तयार होऊ शकतात..; माजी मुख्यमंत्र्यांच्या विधानानं खळबळ..

सरकारनामा ब्यूरो

साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. वर्षभरापूर्वी राज्यात शिवसेनेत फूट पडून सत्तातर झाले. त्यानंतर राष्ट्रवादी फुटली NCP Crisis) अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. राज्यातील या घडामोडींनंतर शेजारच्या राज्यातही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. एका ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या विधानामुळे या राज्यात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटकाबाबत मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. त्यामुळे येथील बिगर भाजप सरकारच धोक्यात येऊ शकते. कर्नाटकात जेडीएस नेता, माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांच्या विधानामुळे खळमळ माजली आहे.

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, "'कर्नाटकात येत्या काळात काहीही होऊ शकतं. कर्नाटकातही कोणी अजित पवार' समोर येऊ शकतात. वर्षाअखेरीस किंवा लोकसभा निवडणुकांनंतर या घडामोडींनी वेग घेतला जाऊ शकतो,"

कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची आशा असताना त्यांना सबुरीची भूमिका घेण्याचा सल्ला देत सिद्धारमैया यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. कॉंग्रेसने डीकेंना उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी केलं. त्यानंतर या दोघांमधील तणाव वाढत असल्याची चर्चा रंगत आहे.

अजित पवार आणि आठ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. काल (गुरुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार गटाच्या दोन सभा झाल्या. आत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर घणाघात केला.

शरद पवार हे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी सभा घेतली तर सभेनेच उत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT