NCP Crisis Live News Updates :...तर मी पवारांची औलाद असल्याचे सांगणार नाही.. ; अजित पवार संतापले..

Ajit Pawar on Sharad Pawar : कुणाला काही सांगायचे नाही असे सांगून मला शांत केले.
Ajit Pawar News
Ajit Pawar Newssarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar on Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या आमदार समर्थकांनी बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली. (Todays Rashtrawadi Meeting)

अजित पवार म्हणाले, "२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी आली होती तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडण्यात आले नाहीतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री राज्यात राहिला असता. २०२२ वेळाही संधी आपण सोडली.

"२०१७ ला शिवसेना जातीयवादी वाटत होती म्हणून भाजपसोबत न जाण्याची भूमिका मोठ्या नेत्यांनी घेतली आणि नंतर शिवसेनेसोबत जात भाजप जातीयवादी कसे वाटले. मी उद्धव ठाकरेंना सांगितले होते की शिवसेनेत नाराजी आहे, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले." असा आरोप अजितदादांनी केला.

"मी महाराष्टाला कधी खोटं बोलणार नाही, खोटे बोलेल तर मी पवारांची औलाद असल्याचे सांगणार नाही म्हणत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केली. पण मला सांगण्यात आले कुणाला काही सांगायचे नाही असे सांगून मला शांत केले," असे अजित पवार म्हणाले.

"भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदारांची तयारी होती पण मध्येच भूमिका बदलण्यात आली. भाजपमध्ये ७५ व्या वर्षी रिटार्यमेंट घेतली असे म्हणत अजित पवार म्हणाले की शरद पवार ८३ वर्षांचे झाले आता थांबणार कधी, त्यांनी आता सल्लागार व्हायला हवे, असे म्हणत शरद पवारांनी आता थांबयला हवे, असा सल्ला दिला.

Ajit Pawar News
NCP Crisis Live News Updates अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा ; "ही वेळ का आली.. प्रत्येकाचा काळ असतो..;

अजित पवार यांनी शरद पवार आणि देशातील विविध पक्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. हे सांगत असताना अजित पवार यांनी ही वेळ का आली, याबाबत स्पष्टीकरण दिलं.

"शरद पवार साहेबांच्या छत्रछायेखाली मी तयार झालो. आज मी जो काही तो पवार साहेबांमुळेच. १९७८ पासून पवारांना देशानं साथ दिली. प्रत्येकाचा काळ असतो," असे सांगत त्यांनी पवाराबाबत सूचक विधान केलं.

"देशाला करिष्मा असलेले नेतृत्व लागतं," असे सांगत अजितदादांनी देशात आलेल्या विविध पक्षाची सरकारबाबत सांगितले. "जयप्रकाश नारायण यांच्या जनता पक्षाला त्यावेळी निवडून दिले. तो पक्ष आता शोधावा लागतो," असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar News
NCP Meeting : 'आर. आर. पाटलांनी भाजपला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही बाकी आहे..' ; दहा वर्षांपूर्वीचा Video होतोय व्हायरल

अजित पवारांनी यावेळी १९९८ च्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा मुद्या काढला. "सोनिया गांधी या परदेशी आहेत, म्हणून त्या पंतप्रधान होऊ शकत नाही," असे पवार साहेबांनी सांगितले, ते आम्ही ऐकले. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. आम्ही सक्रिय झालो. १९९९ मध्ये सात जिल्ह्याचं खातं मिळालं," असे सांगत अजित पवार यांनी त्यांना मिळालेल्या जबाबदारी बाबत सांगितले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com