West Bengal election news update TMC vs BJP Sarkarnama
देश

West Bengal Election : भाजप उमेदवार अन् आयोगाने नेमलेल्या IPS अधिकाऱ्यामध्ये गुप्त बैठक? TMC पुराव्यासह कोर्टात, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड

TMC writ petition, Calcutta High Court case : पुरावा म्हणून लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज याचिकेसोबत दिल्याचे टीएमसीकडून सांगण्यात आले.

Rajanand More

TMC vs BJP election controversy : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. प्रामुख्याने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता तृणमूलने भाजपवर गंभीर आरोप करत थेट कोलकाता हायकोर्टात धाव घेतली आहे.

तृणमूल काँग्रेसने कोर्टात याचिका दाखल करत थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमलेल्या आयपीएस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. IPS अधिकारी परमार स्मित पुरषोत्तमदास यांची निवडणूक निरीक्षक म्हणून करण्यात आलेली नियुक्ती वादात अडकली आहे. त्यांनी बेकादेशीरपणे भाजप उमेदवारासोबत बैठक घेत नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप टीएमसीने केला आहे.

टीएमसीचे नेते राजीव कुमार यांनी दाखल केलेली याचिका मगरहाट विधानसभा मतदारसंघातील आहे. तिथे गौर घोष हे भाजपचे उमेदवार असून वादात अडकले आहेत. याचिकेमध्ये म्हटले आहे की, कोणताही दुजाभाव न करत स्वतंत्रपणे काम करणे अपेक्षित असताना संबंधित आयपीएस अधिकाऱ्याने घोष यांच्यासोबत बेकायदेशीरपणे गुप्त बैठक घेतल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

आयपीएस पुरूषोत्तम दास हे दक्षिण २४ परगणा भागातील चार मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक आहेत. त्यांना राहण्यासाठी आयपीएस मेसमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. पण प्रोटोकॉलचे उल्लंघन करत ते २० एप्रिलला डायमंड हार्बर येथील सागरिका टुरिस्ट लॉजवर राहिले. त्याचदिवशी भाजप उमेदवारासोबत तिथेच बैठक झाल्याचेही याचिके म्हटले आहे.

पुरावा म्हणून लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज याचिकेसोबत दिल्याचे टीएमसीकडून सांगण्यात आले. निवडणूक निरीक्षक म्हणून दिलेल्या जबाबदारीचे उल्लंघन झाले आहे. याचिकेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या वागणुकीवर गंभीर आक्षेप घेण्यात आले असून त्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करण्यात आले आहे. कोलकाता हायकोर्टाकडून लवकरच त्यावर सुनावणी घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, बैठक नेमकी कशासाठी झाली, याबाबत टीएमसीकडून याचिकेत कोणताही दावा केलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT