Rajya Sabha news : मोठी बातमी : राघव चड्ढांना ‘आप’ धक्का देण्याच्या तयारीत, दुसरीकडे 7 खासदारांबाबत सभापतींनी घेतला सर्वात मोठा निर्णय

AAP MPs Join BJP | Rajya Sabha Merger News : संजय सिंह यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत राज्यसभा सभापतींकडे सात खासदारांची सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका दाखल केल्याची माहिती दिली होती.
CP Radhakrishnan, Arvind Kejriwal, Raghav Chadha
CP Radhakrishnan, Arvind Kejriwal, Raghav ChadhaSarkarnama
Published on
Updated on

AAP MPs merger : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील सात खासदारांनी बंड करत पक्षासह अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का दिला आहे. या सातही खासदारांनी राज्यसभेत पक्षाचा स्वतंत्र गट स्थापन करत तो भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला. सर्व खासदारांच्या सह्यांचे तसे पत्रही राज्यसभा सभापतींना चार दिवसांपूर्वीच दिले होते. त्यानंतर ‘आप’नेही मोठं पाऊल उचलत सातही खासदारांचे सदस्य रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सभापतींकडे दाखल केली आहे.

आपने याचिका दाखल केल्यानंतर काही तासांत सभापतींनी सातही खासदारांच्या भाजपमधील विलीनीकरणावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता हे सातही खासदार यापुढे भाजपचे सदस्य असतील. सभापतींच्या या निर्णयामुळे आप आणि केजरीवालांना मोठा धक्का बसला आहे. तर भाजपच्या राज्यसभेतील सदस्यांची संख्या ११३ वर पोहोचली आहे.

राघव चड्ढा यांच्यासह अशोक कुमार मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजीत सिंह साहनी, स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता अशी या सात खासदारांची नावे आहेत. आता यापुढे ते सत्ताधारी बाकांवर बसतील. चड्ढा, पाठक आणि मित्तल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आपण भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा केली होती.

CP Radhakrishnan, Arvind Kejriwal, Raghav Chadha
AAP MP Revolt : फुलप्रुफ प्लॅन, पण एका खासदाराने खबर दिली अन् बंडाच्या हालचालींना वेग; फोनाफोनी सुरू होताच सगळं गुप्तपणे झालं...

त्यानंतर या तिघांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली होती. नबीन यांनी त्यांना पेढा भरवत पक्षात स्वागत केले होते. या सातपैकी सहा खासदार पंजाबमधून तर एक खासदार दिल्लीतील आहे. आता आपचे राज्यसभेत केवळ तीन खासदार उरले आहेत. त्यामध्ये संजय सिंह, नारायण दास गुप्ता आणि संत बलबीर सिंह यांचा समावेश आहे.

CP Radhakrishnan, Arvind Kejriwal, Raghav Chadha
Chandrapur municipal politics : चंद्रपूर महापालिकेत पुन्हा मोठा राजकीय धमाका होणार? बड्या नेत्यानं नगरसेवकांचे आकडे सांगत उडवून दिली खळबळ...

संजय सिंह यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत राज्यसभा सभापतींकडे सात खासदारांची सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका दाखल केल्याची माहिती दिली होती. संविधानानुसार सातही खासदारांचे सदस्यत्व रद्द होईल, असा विश्वास संजय सिंह यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर काही तासांत सभापतींनी सात खासदारांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com