West Bengal NIA Team Attack News Sarkarnama
देश

West Bengal NIA Attack : बंगालमध्ये ईडीनंतर आता NIA च्या पथकावर हल्ला; वाहनांवर दगडफेक; अधिकारी जखमी!

Chetan Zadpe

West Bengal News : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांवरील हल्ले थांबण्याचे चिन्हे दिसत नाहीत. मागील काही दिवसांत संदेशखळी भागात ईडीच्या तपास पथकाला टार्गेट केल्यानंतर आता एनआयएच्या पथकावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार आता केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या पथकावर पूर्व मेदिनीपूरच्या भूपतीनगरमध्ये हल्ला करण्यात आला. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एनआयएचे पथक शनिवारी तपासासाठी गेले, तपास करणाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

दोन व्यक्तींना चौकशीसाठी घेऊन जात असताना त्यांच्या पथकावर हा हल्ला झाल्याचा दावा एनआयएने केला आहे. एनआयएचे अधिकारी या परिसरात झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी भूपतीनगर येथे गेले होते. जेव्हा एनआयएचे पथक दोन जणांना चौकशीसाठी येथून घेऊन जात होते, त्याचवेळी तेथील स्थानिक लोकांनी एनआयएच्या वाहनाला घेराव घातला आणि दोघांच्या सुटकेची मागणी करत कारवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या वेळी काही लोकांनी वाहनांवर दगडफेकही केली. या हल्ल्यात एनआयएचे दोन अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणी एनआयएने पोलिसांत (Police) तक्रार दाखल केली आहे. भूपतीनगरमध्ये केंद्रीय पोलिस दलाचा मोठा ताफा तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, 2 डिसेंबर 2022 रोजी भूपतीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत, अर्जुननगर ग्रामपंचायतीच्या नैराबिला गावात रात्री 11 वाजता एक स्फोट घडून आला होता.

या घटनेत तृणमूलचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना, त्यांचा भाऊ देवकुमार मन्ना आणि विश्वजित गायेन यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयएने या घटनेचा तपास हाती घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयए घटनेचा तपास करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

राज्यपाल म्हणाले - घटनेची पूर्ण गांभीर्याने दखल घेतली पाहिजे

पश्चिम बंगालचे (West Bengal) राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत सांगितले की, हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे. राज्यपाल म्हणाले, "तपास यंत्रणांना त्रास देण्याच्या प्रयत्नांमुळे कोणालाही फायदा होणार नाही. या प्रकरणाला कठोरपणे हाताळले पाहिजे. ही एक अतिशय गंभीर परिस्थिती आहे, असे बोस राजभवनातून म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT