Dk Shivkumar Next CM ? : डी. के. शिवकुमारांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा होणार; सिद्धरामय्या जाणार राष्ट्रीय राजकारणात?

Siddaramaiah Will National Politics : जुन्या समाजवादी नेत्यांना काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट करण्यासाठी ते महत्वाची भूमिका बजावतील, असाही वरिष्ठांचा होरा आहे.
Siddaramaiah-DK Shivkumar
Siddaramaiah-DK ShivkumarSarkarnama

Karnataka News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे लवकरच राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेस नेत्यांनीच सिद्धरामय्या यांना गळ घातल्याचे सांगितले जात आहे. सिद्धरामय्या हे लोकसभा निवडणूक जिंकल्यास काँग्रेस पक्षासाठी मोठा आधार बनतील, अशी आशा पक्षाच्या नेत्यांना आहे. तसेच, जुन्या समाजवादी नेत्यांना काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट करण्यासाठी ते महत्वाची भूमिका बजावतील, असाही वरिष्ठांचा होरा आहे. (Karnataka Chief Minister Siddaramaiah Will enter national politics?)

दरम्यान, राष्ट्रीय राजकारणात जाण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नकार दिला आहे. मात्र, काँग्रेस पक्षाकडून त्यांना तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी तिढा निर्माण झाल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा करार केल्याचे सांगितले जाते. मात्र, काँग्रेसने तसंही कुठेही जाहीर केलेले नाही. मात्र, सिद्धरामय्या राष्ट्रीय राजकारणात गेल्या डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Siddaramaiah-DK Shivkumar
Pandharpur Band : फडणवीस राजीनामा द्या; अन्यथा पंढरपुरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ उधळून लावू , मराठा समाजाचा इशारा

काँग्रेसने लोकसभा निवडणूक फार गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच पक्षाकडून फार विचारपूर्वक पावले टाकली जात आहे. त्यातच कर्नाटकात असलेला जनाधार वाढवून लोकसभेच्या २८ पैकी किमान २० जागा तरी जिंकायच्याच, अशी व्यूहरचना काँग्रेसकडून आखली जात आहे. त्याच व्यूहरचनेचा भाग म्हणून सिद्धरामय्या यांना पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंणगात उतरविण्याचे डावपेच काँग्रेसने आखले आहेत.

सिद्धरामय्या यांनी यापुढे आपण निवडणूक लढविणार नसल्याचे मध्यंतरी जाहीर केले होते. कारण, त्यांना दुसऱ्या टर्ममध्येही मुख्यमंत्रिपदी पाच वर्षे राहायचे आहे. लोकसभा निवडणुकीबाबत अजूनही त्यांनी कोणतेही सूतोवाच केलेले नाही. सिद्धरामय्या यांना कर्नाटकात मागासवर्गीयांचा भरभक्कम पाठिंबा आहे. सिद्धरामय्या यांची ती हवा कॅश करण्याचा प्रयत्न काँग्रेसडून होताना दिसत आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे उत्तर भारतातील जुन्या समाजवादी मित्रांना काँग्रेस पक्षाकडे खेचण्यासाठी सिद्धरामय्या सोयीचे ठरतील, अशी आशा काँग्रेस नेत्यांना आहे.

Siddaramaiah-DK Shivkumar
Ajit Pawar Group NCP Melava : कार्यकर्ते जिलेबी-भातावर ‘तुटून पडले’; पण उपाशी कार्यकर्त्यांनी नेत्यांनाच हासडल्या शिव्या...

काँग्रेसचे केंद्रात सरकार आल्यास महत्वाचे खाते देण्याचा शब्दही पक्षाच्या नेत्यांकडून सिद्धरामय्या यांना देण्यात आल्याचा सांगण्यात येत आहे. सिद्धरामय्या केंद्रात गेल्यास राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांचा मुलगा यतिंद्र सिद्धरामय्या यांना मंत्रीपद देण्याचे आश्‍वासन काँग्रेसने दिल्याचे समजते. निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या हमी योजनांची अंमलबजावणी केल्याने काँग्रेस सरकारची लोकप्रियता वाढली आहे.

Siddaramaiah-DK Shivkumar
Pawar-Fadnavis Absence In Buldhana : बुलडाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी; जालन्यातील लाठीहल्ला ठरले कारण?

भाजपचे नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत?

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवार निवडीची तयारी सुरू केली आहे. भाजप अजूनही पराभव आणि गटबाजीतून अद्याप बाहेर आलेला नाही. त्यातूनच माजी मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. सोमन्ना, खासदार रेणुकाचार्य, कट्टा सुब्रह्मण्य नायडू आणि इतर अनेक महत्त्वाचे लोक भाजपला जय श्रीराम म्हणण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com