Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee : विधानसभेतील पराभवानंतरही ममतादीदींचा करिष्मा कायम; बार कौन्सिलच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा

West Bengal Bar Council election results: विधानसभेतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना बार कौन्सिलच्या निवडणुकीत मोठा दिलासा; टीएमसी समर्थित १५ उमेदवार विजयी, भाजपला केवळ तीन जागा.

Rajanand More

BJP Defeat News : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवनानंतर पहिला दिलासा मिळाला आहे. विधानसभेनंतर राज्यात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. या निवडणुकीत भाजपसह इतर पक्षांचा धुव्वा उडाला आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना वारंवार राजकीय झटके बसत आहे. अनेक आमदार, खासदारांनी साथ सोडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ताही त्यांच्या हातून जात आहे. या नामुष्कीनंतर ममतादीदींना पश्चिम बंगाल बार कौन्सिलच्या निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे. कौन्सिलच्या २३ पैकी १५ जागांवर तृणमूल काँग्रेस समर्थित उमेदवारांचा विजय झाला आहे.

बार कौन्सिलमध्ये टीएमसीचा दबदबा कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. तृणमूल काँग्रेससमोर राज्यात पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपचा दारुण पराभव झाला असून पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. तर डाव्या पक्षांना तीन आणि काँग्रेसलाही दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या शिफारशीवरून तृणमूल समर्थित २३ उमेदवारांपैकी १५ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामध्ये चार महिला वकिलांचा समावेश आहे. निवडणुकीत एकूण ७५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी टीएमसीचे २३, भाजपचे २२, डाव्या पक्षांचे १२ आणि १८ अपक्ष उमेदवार होते. टीएमसी लॉयर्स सेलचे सदस्य माजी खासदार शुभाशीष चक्रवर्ती हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहे.

निवडणुकीबाबत टीएमसी लॉयर्स सेलचे सदस्य संजय वर्धन यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालयांमध्ये वकिली करत असलेल्या सदस्यांच्या मतदानातून बार कौन्सिलची निवडणूक पार पडली. लवकरच टीएमसीकडून नवे मंडळ नियुक्त केले जाईल. दरम्यान, तृणमूल काँग्रेसला मिळालेला हा विजय ममता बॅनर्जी यांच्या गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT