Jagdeep Dhankhar news : माजी उपराष्ट्रपती धनखड यांनी मतदान केलेल्या निवडणुकीत भाजप नेत्याचा दारुण पराभव

Supreme Court Bar Association election : बार असोसिएशनच्या निवडणुकीत गौरव भाटिया यांचा दारुण पराभव, माजी मुख्य न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदूल यांनाही फक्त २१७ मते; उपाध्यक्षपदी राहुल कौशिक तर सचिवपदी प्रज्ञा बघेल विजयी.
Jagdeep Dhankhar in Supreme Court
Jagdeep Dhankhar in Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

SCBA election result : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यापासून बहुतेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमांपासून चार हात लांबच राहतात. आतापर्यंत त्यांनी थेट मीडियाशीही संवाद साधलेला नाही. आपल्या राजीनाम्यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ते क्वचित एखाद्या कार्यक्रमात सहभागी झाल्यास काय बोलणार, कुणाला भेटणार याबाबत उत्सुकता असते.

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनची (SCBA) निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीसाठी धनखड यांनीही मतदानात सहभाग घेतला. धनखड हे नामांकित वकीलही आहेत. १९९० पासून त्यांनी सुप्रीम कोर्टात वकिली सुरू केली होती. त्यानंतर ते राजकारणातही सक्रीय होते. राज्यपाल, उपराष्ट्रपती या पदांवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर धनखड हे यावर्षीच्या सुरूवातीलाच पुन्हा बार असोसिएशनचे सदस्य बनले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी अनेक वर्षांनंतर मतदानात सहभाग घेतला. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ज्येष्ठ विधिज्ञ गौरव भाटिया यांचाही समावेश होता. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे वकिलांसह राजकीय नेत्यांचेही लक्ष लागले होते.

Jagdeep Dhankhar in Supreme Court
Shiv Sena symbol case : एकनाथ शिंदेंचे 39 आमदार अपात्र ठरले असते अन् आयोगाचा फॉर्म्यूला तोच असता तर..! ठाकरेंचे 34 शिलेदार ठरले असते वरचढ

निवडणुकीत गौरव भाटिया यांचा दारुण पराभव झाला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप राय हे ८२२ मते मिळवून मोठ्या फरकाने विजयी झाले आहे. भाटिया यांना केवळ ३७० मते मिळाली असून ते थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. विधिज्ञ अनुपम लाल दास आणि आदिश अगरवाला हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

Jagdeep Dhankhar in Supreme Court
Prithviraj Chavan news : पृथ्वीराज चव्हाण यांचे नव्या शिक्षणमंत्र्यांबाबत मोठं भाकित; थेट कॉर्पोरेट जगतातील प्रसिध्द नावच सांगितलं...

माजी मुख्य न्यायमूर्तींचा पराभव

निवडणुकीत मणिपूर हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायमूर्ती सिध्दार्थ मृदूल हे अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. केवळ २१७ मतांपर्यंतच त्यांना मजल मारता आली. त्यामुळे ते सहाव्या क्रमांकावर राहिले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकी राहुल कौशिक यांनी तर सचिवपदासाठी प्रज्ञा बघेल यांनी बाजी मारली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com