adhir ranjan chowdhury  sarkarnama
देश

Congress politics : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलमध्ये युती? अधीर रंजन चौधरींचा राजीनामा

Congress Trinamool Congress : लोकसभेतील अपयशानंतर अधीर रंजन चौधरी यांनी दिलेला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस-तृणमूलच्या युतीचे दरवाजे उघडे झाले आहेत.

Roshan More

Congress politics : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढले. भाजप विरोधात इंडिया आघाडीत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्याच राज्यात काँग्रेससोबत युती केली नाही. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली. तर तृणमूलला 29 जागा तर, भाजपला 12 जागा मिळाल्या.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांचा ममता बॅनर्जींना कडवा विरोध होता. त्यामुळे देखील काँग्रेस-तृणमूल युती होऊ शकली नाही. मात्र, लोकसभेतील अपयशानंतर अधीर रंजन चौधरी यांनी दिलेला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस-तृणमूलच्या युतीचे दरवाजे उघडे झाले आहेत.

2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कामाला लागली आहे. पक्षसंघटना, बुथ कमिट्या मजबुत करण्यावर शिवाय तृणमूल काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा करण्यावर काँग्रेस नेत्यांचा भर आहे.

सोमवारी पश्चिम बंगालमधील 21 नेत्यांनी काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीमध्ये बंगालमधील काँग्रेसचे एकमेव खासदार ईशा खान चौधरी या देखील सहभागी झाल्या होत्या. या बैठकीत ब्लाॅक स्तरापासून विधानभा-लोकसभा क्षेत्रापर्यंत समित्या बनवत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाली.

अधीर रंजन चौधरींची अडचण दूर

अधीर रंजन चौधरी यांचा ममतांना विरोध होता. ममता आणि चौधरी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत होते. मात्र, आता अधीर रंजन चौधरी यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारला आहे. आता त्यांच्याकडे कुठलेही महत्त्वाचे पद नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेससोबत चर्चा करताना अधीर रंजन चौधरी यांची अडचण स्थानिक नेत्यांना असणार नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्यात अडथळा येणार नाही, असे काँग्रेस नेत्याचे मत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT