West Bengal Assembly Election 2026_BJP Sankalp Patra Published by Amit Shah 
देश

West Bengal Election: पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी भाजपचा महाराष्ट्र-बिहार पॅटर्न! महिलांवर केली आश्वासनांची खैरात; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट

West Bengal Election 2026: पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी यंदा भाजपचा चांगलाच जोर लावला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपकडून हरऐक प्रयत्न केले जात आहेत.

Amit Ujagare

West Bengal Election 2026: पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी यंदा भाजपचा चांगलाच जोर लावला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपकडून हरऐक प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, भाजपनं महाराष्ट्र आणि बिहारचा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या संकल्प पत्रात अर्थात जाहीरनाम्यात त्यांनी मोठ्या घोषणांचा वर्षावर केला आहे. यामध्ये विशेषतः महिला मतदारांना टार्गेट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या गिफ्टची घोषणाही करण्यात आली आहे.

शुक्रवारी भाजपनं पश्चिम बंगालसाठी संकल्प पत्र जाहीर केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या संकल्प पत्राचं प्रकाशन करण्यात आलं. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यास सहा महिन्यांच्या आत राज्यात समान नागरी कायदा लागू करणार, याशिवाय राज्यात ४५ दिवसांच्या आत आठवा वेतन आयोग लागू केला जाईल, शेतकर्यांना पीएम किसान योजनेंतर्गत अतिरिक्त ३ हजार रुपयांची मदत दिली जाईल.

त्याचबरोबर शहा यांनी म्हटलं की, हे घोषणापत्र बंगालच्या प्रत्येक वर्गाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा एक मार्ग आहे. विविध प्रकारे भीतीच्या छायेत जगत असलेल्या बंगालच्या शेतकऱ्यांना नवा मार्ग हे संकल्प पत्र दाखवेल. हे घोषणापत्र बंगालच्या जनतेसमोर पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील विकसित भारताचं प्रतिबिंबही आहे. बंगालचे लोक भयभीत आणि हताश आहेत ते मनापासून बदल घडवू इच्छित आहेत. आज आम्ही बंगालच्या विधानसभेत प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काम करत आहोत, पण लवकरच सत्ताधारी म्हणून कार्यरत असू असा विश्वासही यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केला.

महिलासाठी विशेष घोषणा

प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आताच महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये देणार. महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नावानं ही योजना लागू असून यामध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. तसंच बिहारमध्ये देखील महिलांच्या खात्यात आचारसंहिता सुरु असताना एकाच वेळी १०,००० रुपये देण्यात आले होते. तसंच उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

त्याचबरोबर बंगालमध्ये राज्य परिवहनच्या बसमधून महिलांना मोफत प्रवासाची घोषणाही भाजपनं केली आहे. महाराष्ट्रातही ही योजना लागू असून महिला प्रवाशांना सरसकट अर्ध्या तिकीटाची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांना नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचं आश्वासनही भाजपनं दिलं आहे. महाराष्ट्रतही सध्या शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण लागू आहे.

इतर घोषणांचा पाऊस

  1. बेरोजगार तरुणांना महिन्याला ३,००० रुपये अर्थसहाय्यता मिळणार

  2. नदी नाल्यांमध्ये कचरा-राडारोडा टाकला जाऊ नये यासाठी नवी आणि अत्याधुनिक यंत्रणा राबवणार

  3. अवैध घुसखोरी रोखण्यासाठी बांगलादेशच्या सीमेवर तारांची सीमाभिंत उभारणार यासाठी ४५ दिवसांमध्ये जमीन उपलब्ध करुन देणार

  4. घुसखोरीविरोधात कडक पावलं उचलणार आणि प्राण्यांच्या तस्करी रोखण्यासाठी व्यवस्था आणणार

  5. हल्दियाचा बंदर हे विकास आणि ब्लू इकॉनॉमी या दोघांचं केंद्र बनवण्यासाठी पावलं उचलणार

  6. बंगालच्या संस्कृतीक वारसा पुढे नेण्यासाठी वंदे मातरम् संग्रहालयाची कल्पना मांडणार

  7. भविष्यातील विकास क्षमता वाढवण्यासाठी बंगालमध्ये चार नव्या टाऊनशिप विकसित केल्या जाणार

  8. भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तीन श्वेतपत्रिका काढणार

  9. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री आरोग्य योजनेला केंद्रातील आयुष्यमान भारत योजनेशी जोडणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT