Shivsena politics : परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना दुहेरी इशारा; सरकार करणार परवाना रद्द, शिवसेना देणार प्रसाद

Shivsena warning to Non marathi taxi rickshaw drivers Over marathi language : महाराष्ट्रात रिक्षा व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषेचे ज्ञान असणे आता अनिवार्य झाले आहे. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांना परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना इशाराच दिला आहे.
Shivsena Politics in zilla parishad panchayat samiti election; eknath shinde
Shivsena Politics in zilla parishad panchayat samiti election; eknath shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. टॅक्सी व रिक्षा चालकांसाठी परवाना घेताना किंवा नूतनीकरण करताना जुजबी मराठी येणे आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले आहे.

  2. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी या निर्णयाला समर्थन देत मराठी न बोलणाऱ्या चालकांना इशारा दिला.

  3. या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Shivsena politics News : महाराष्ट्रात परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना एक मे पासून वाहन परवाना काढताना तोडकं-मोडकं का होईना मराठी बोलावे लागेल असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. त्यांनी, महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि जनसेवेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे, असे म्हटल्यानंतर ठाणे, मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये रिक्षा-टॅक्सीचालकांची व्यापक भाषा चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली.

या धडक मोहिमेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचे आधीच धाबे दणाणले आहेत. अशातच आता परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांनी जुजबी का होईना मराठी बोलावेच लागेल. मराठी बोलता आले नाही तर प्रसाद (मार) खायला तयार राहा, असाच इशाराच दिला शिंदेंच्या शिवसेनेनं आहे. या इशाऱ्यानंतर आता राज्यात पुन्हा मराठी अमराठी वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य असल्याचे या आधीच अनेकदा अनेक मंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान ठाणे, मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये रिक्षा-टॅक्सीचालकांकडून प्रवाशांना होणारा भाषेचा त्रास ही आता वाढल्याचे समोर आले आहे.

Shivsena Politics in zilla parishad panchayat samiti election; eknath shinde
Shivsena Politics : रवींद्र धंगेकर, नाना भानगिरे अडचणीत! संतप्त 200 कार्यकर्त्यांची एकनाथ शिंदेंकडे धाव

यावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि जनसेवेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे, असे म्हणत नवे आदेश काढले. त्यांच्या आदेशामध्ये परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांनी एक मे पासून वाहन परवाना काढताना जुजबी का होईना मराठी हे बोलावे लागेल असे म्हटले आहे.

आता या आदेशानंतर आरटीओने ५०० हून अधिक संशयित रिक्षाचालकांची उलट तपासणी केली. यामध्ये चालकांशी थेट मराठीत संवाद साधून त्यांच्या भाषिक कौशल्याची खातरजमा केली जात आहे. तसेच ज्या रिक्षाचालकांना मराठी अजिबात अवगत नाही अशांचे व्यावसायिक परमिट कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तर ही तपासणी मोहिम पुढील महिनाभर सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे. यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांचे आधीच धाबे दणाणले आहेत.

अशातच आता शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी देखील ज्यांना मराठी येत नाही त्यांनी प्रसाद (मार) खायला तयार राहा, असे म्हणत गंभीर इशारा दिला आहे. ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. सावंत यांनी, परराज्यातून पोट भरण्यासाठी परप्रांतीय मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांचे शिवसेना (शिंदे) पक्षाकडून स्वागतच आहे. पण त्यांना मराठी बोलता आली पाहिजे. त्यांना जुजबी मराठी बोलता आल्यास त्यांनाच त्याचा फायदाच होणार आहे.

पण जर परप्रांतीय चालक जर जुजबी मराठी बोलू शकले नाही तर त्यांनी प्रसाद खाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा दिला आहे. पण आता यामुळे वादाला तोंड फुटले असून समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी या आदेशाला विरोध केला आहे. तसेच हा विरोध चुकीचा असून परप्रांतीयांना रोजगार पासून वंचित ठेणारा असल्याचा म्हटले आहे.

Shivsena Politics in zilla parishad panchayat samiti election; eknath shinde
Shivsena Politics : शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगरला' बळ : संजय जाधवांची अमित शहांसोबत खलबत; नागेश पाटील अन् संजय देशमुख बड्या नेत्याकडे जेवायला

FAQs :

1. चालकांसाठी मराठी भाषा का आवश्यक केली जात आहे?
ग्राहकांशी संवाद सुलभ व्हावा आणि स्थानिक भाषेचा वापर वाढावा यासाठी हा प्रस्ताव आहे.

2. हा नियम कधी लागू होणार आहे?
एक मेपासून हा नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

3. कोणत्या चालकांवर हा नियम लागू आहे?
टॅक्सी आणि रिक्षा चालकांवर हा नियम लागू होऊ शकतो.

4. मराठी येत नसल्यास काय होईल?
याबाबत इशारे देण्यात आले असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

5. या मुद्द्यावर वाद का निर्माण झाला आहे?
मराठी विरुद्ध अमराठी या भाषिक मुद्द्यामुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com