Voters queue up across West Bengal as early polling sees high turnout, with Narendra Modi highlighting strong participation. Sarkarnama
देश

West Bengal election voting : बंगालमध्ये पहिल्या 4 तासांतच मोठा खेळ, रेकॉर्ड होणार; मतदान सुरू असतानाच खुद्द PM मोदींनीच दिले संकेत...

PM Narendra Modi reaction : सोशल मीडियात मतदारांच्या लांबच लांब रांगाचे फोटो येत आहेत. भीतीविरहित वातावरणात मतदान सुरू आहे. मागील सहा-सात दशकांनंतर असे अविश्वसनीय चित्र दिसत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Rajanand More

WB assembly election news : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणेच आजही मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्या टप्प्यातील रेकॉर्डब्रेक मतदानानंतर आता दुसरा टप्पाही त्याला अपवाद ठरणार नाही, असेच मतदान होताना दिसत आहे. पहिल्या चार तासांतच तब्बल ४० टक्के मतदान झाले आहे.

मतदानाच्या पहिल्या टप्प्यात जवळपास ९२ टक्के मतदान झाले होते. या मतदानाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. आता दुसऱ्या टप्प्याची सुरूवातही छप्परफाड झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास ४० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वच मतदार केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा दिसत आहेत. त्यामुळे या टप्प्यातही रेकॉर्डब्रेक मतदान होण्याची चिन्हे आहेत.

उत्तर प्रदेशात विकासकामांचे लोकार्पण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नजरेतूनही ही बाब निसटली नाही. त्यांनी आपल्या भाषणातही बंगालमधील मतदानाचा उल्लेख करत म्हटले की, बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणेच लोक मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत.

सोशल मीडियात मतदारांच्या लांबच लांब रांगाचे फोटो येत आहेत. भीतीविरहित वातावरणात मतदान सुरू आहे. मागील सहा-सात दशकांनंतर असे अविश्वसनीय चित्र दिसत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. लोक न घाबरता मतदान करत आहेत. हे देशाच्या संविधानाचे आणि लोकशाहीच्या बळकटीकरणाचे प्रतीक आहे, सांगत पंतप्रधानांनी मतदारांबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.

पाचही राज्यांत विजयाचा विश्वास

पंतप्रधान मोदींनी यावेळी बंगालसही तमिळनाडू, केरळ, ओडिशा आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांत भाजपचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, पाचही राज्यांमध्ये भाजप विजयाची ऐतिहासिक हॅट्ट्रिक करेल, असा मला विश्वास आहे. या राज्यांतील ४ मे रोजीचे निकाल विकसित भारताच्या संकल्पाला बळ देतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, बंगालमधील मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. त्यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. या टप्प्यात सर्वाधिक हायहोल्टेज मतदारसंघ असलेल्या भवानीपूरमध्येही मतदान होत आहे. ममता बॅनर्जी विरुध्द सुवेंदू अधिकारी अशी लढत या मतदारसंघात होत आहे. त्यामुळे या मतदारसंघात तृणमूलसह भाजपनेही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून मतदानादरम्यानही त्याचे पडसाद उमटत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT