Gujarat election results : अयोध्येतील पराभवानंतर आता भाजपला सरदार पटेलांचा सर्वात उंच पुतळा असलेल्या भागातही धक्का

Narmada district AAP win, BJP setback Gujarat : आपचे आमदार चैतर वसावा यांचा या भागातील दांडगा जनसंपर्क आणि लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न उपस्थित करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे मतदारांनी आपला पसंती दिल्याची चर्चा आहे.
Narmada civic polls result
Narmada civic polls resultSarkarnama
Published on
Updated on

Local body elections Gujarat : गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा भाजपने आपली ताकदी दाखवून दिली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालांमध्ये संपूर्ण राज्यात भाजपचाच दबदबा असल्याचे दिसून आले. भाजपच्या या लाटेत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला जोरदार झटका बसला. पण गुजरातमधील काही भागांत भाजपचे पारंपरिक गड उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे त्याचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकसभेच्या २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यात आली होती. पण निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर या भागात भाजपचा पराभव झाला होता. आता गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातही भाजपला धक्का बसला आहे. याच भागात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वाधिक उंच पुतळा आहे. याच भागात आम आदमी पक्षाने भाजपला जोरदार झटका दिला आहे.

नर्मदा जिल्हा आदीवासी बहुल असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत २२ पैकी १५ जागांवर आपचा विजय झाला आहे. तर ६ पैकी चार पंचायत समित्याही आपने काबीज केल्या आहेत. भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’हे विकासाचे प्रतिक दाखवून या भागात भाजपकडून प्रचार केला जातो. पण हा प्रचार मतदारांकडून नाकारण्यात आल्याचे निकालावरून दिसते.

Narmada civic polls result
Mumbai High Court : अहंकार आडवा आला! मुंबई हायकोर्टाने मानहानीच्या खटल्याची सुनावणी 2046 पर्यंत पुढे ढकलली...

आपचे आमदार चैतर वसावा यांचा या भागातील दांडगा जनसंपर्क आणि लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न उपस्थित करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे मतदारांनी आपला पसंती दिल्याची चर्चा आहे. या भागात प्रामुख्याने आदिवासींचे अधिकारी, जंगल आणि जमिनीशी संबंधित समस्या आहेत. वसावा यांच्याकडून त्यावर सातत्याने सरकारकडे गाऱ्हाणे मांडले जात होते. त्यांना अटकही झाली होती. त्याचे पडसाद निवडणुकीतही उमटल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

Narmada civic polls result
AAP crisis news : ‘आप’ संपणार, आतिशीही पक्ष सोडणार? राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशानंतर आतिशी म्हणाल्या, 15 वेळा शोक संदेश अन् दर 6 महिन्याला...

भाजपच्या अशाच एका पराभवाची चर्चा होत आहे. राजकोट महापालिकेत भाजपने सत्ता काबीज केली असली तर पक्षाचा गड असलेल्या जांगलेश्वर भागातील वॉर्डमध्ये धक्का बसला आहे. या भागातील चारही उमेदवार पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे चारही उमेदवारी निवडून आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात या भागातील अनेक अनधिकृत बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली होती. त्याविरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड रोष होता. तो मतदानातूनही दिसून आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com