Mumbai High Court : अहंकार आडवा आला! मुंबई हायकोर्टाने मानहानीच्या खटल्याची सुनावणी 2046 पर्यंत पुढे ढकलली...

Defamation suit India, court adjourned 2046 : आपल्याबाबती घडलेल्या घटनांमुळे मानसिक त्रास झाल्याचा दावा करत माय-लेकींनी खटला मागे घेण्यास नकार दिला आणि भरपाईची मागणी केली.
Bombay High Court
Bombay High Court Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra legal news : देशभरातील बहुतेक सर्वच न्यायालयांमध्ये अनेक खटल्यांची सुनावणी वर्षानुवर्षे सुरू असते. सततच्या तारखांमुळे नागरिक त्रस्त असतात. पण एका खटल्यात कोर्टाने थेट २० वर्षानंतरची तारीख दिली आहे. कोर्टाने मानहानीच्या एका खटल्याची सुनावणी थेट २०४६ पर्यंत पुढे ढकलली आहे. मुंबई हायकोर्टाने हा आदेश दिला आहे.

मुंबई हायकोर्टाच्या या आदेशामागचे कारण अहंकार ठरले आहे. न्यायमुर्ती जितेंद्र एस. जैन यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने मंगळवारी हा आदेश दिला आहे. हा खटला एका ९० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने २०१७ मध्ये मुंबईतील श्याम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या व्यवस्थापकीय समिती सदस्यांविरोधात दाखल केला आहे.

सोसायटीच्या सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या वादातून हा खटला दाखल करण्यात आला आहे. सोसायटीच्या दुरुस्ती, सुशोभीकरणाची कामे कमिटी सदस्य हे त्यांच्या ओळखीच्या लोकांना देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे खटला दाखल करणाऱ्या महिलेने सदस्य शुल्क जमा केले नव्हते. त्यामुळे कमिटीने थकित रक्कमेची माहिती व बदनामीकारक मजकूर नोटीस बोर्डवर लावल्याचा दावा करत महिला व तिच्या लेकीने बदनामीचा खटला दाखल केला आहे.

Bombay High Court
Gujarat Election Result : एका निर्णयामुळे भाजपला गडातच पराभवाचा धक्का; नागरिकांनी मतदानातून दिली काँग्रेसला साथ...

सुरूवातीला या माय-लेकींनी सहकार उपनिबंधकांकडे धाव घेतली होती. हा वाद सध्या हायकोर्टात प्रलंबित आहे. दरम्यानच्या काळात सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांविरोधात माय-लेकींनी २० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने प्रतिवादींना माफी मागण्यास सांगतो, खटला मागे घ्या, अशी सूचना केली होती.

आपल्याबाबती घडलेल्या घटनांमुळे मानसिक त्रास झाल्याचा दावा करत माय-लेकींनी खटला मागे घेण्यास नकार दिला आणि भरपाईची मागणी केली. त्यावर कोर्टाने गंभीर निरीक्षण नोंदविले.पक्षकारांमधील अहंकाराच्या लढाईमुळे हा खटला न्यायव्यवस्थेवरील ताण वाढवत आहे. त्यामुळे ज्या खटल्यांना प्राधान्य द्यायला हवे, त्यावर सुनावणी घेणे शक्य होत नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले.

Bombay High Court
AAP crisis news : ‘आप’ संपणार, आतिशीही पक्ष सोडणार? राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशानंतर आतिशी म्हणाल्या, 15 वेळा शोक संदेश अन् दर 6 महिन्याला...

कोणत्याही अटींशिवाय माफी मागून हा वाद मिटविता येऊ शकत होता, अशी सूचना केली होती.कोर्टाने असेही म्हटले की, ९० वर्षीय वादी अजूनही मानहानीचा खटला पुढे सुरू ठेवण्यावर अडून बसल्या आहेत. पक्षकार ज्येष्ठ नागरिक असूनही त्यांना प्राधान्य देऊ शकत नाही, असे म्हणत कोर्टाने थेट २०४६ पर्यंत या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Ramesh Mhatre Custody
Kokare Maharaj Case
Defamation Case; Sushma Andhare and Rupali Chakankar
Balasaheb Thorat Thane Land Case
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com