West Bengal Governor CV Ananda Bose
West Bengal Governor CV Ananda Bose Sarkarnama
देश

Governor CV Ananda Bose : पोलिसांकडूनच माझ्या जीवाला धोका! राज्यपालांच्या दाव्याने खळबळ

Rajanand More

New Delhi : पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार आणि राज्यपला सी. व्ही. आनंदा बोस यांच्यामध्ये सातत्याने खडाजंगी होत असते. राज्यपाल आणि सरकारमध्ये नेहमीच खटके उडत असतात. आतातर राज्यपालांनी थेट सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

राजभवनामधील सध्याचे सुरक्षा प्रमुख आणि त्यांच्या टीमकडूनच आपल्या वैयक्तिक सुरक्षेला धोका असल्याचा आरोप बोस यांनी केला आहे. यावर विश्वास ठेवण्याइतपत माझ्याकडे काही काही कारणेही असल्याचे त्यांनी सांगितले.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना याबाबत कळवले आहे. राजभवनातील कोलकाता पोलिसांमुळे सुरक्षेला धोका असल्याचे सांगूनही त्यावर काहीच कारवाई केली नसल्याचा दावाही बोस यांनी पीटीआयशी बोलताना केला आहे.

बोस यांनी बुधवारीच राजभवन परिसर सोडून जाण्यास पोलिसांना सांगितले होते. पण त्यानंतरही पोलिस राजभवनमध्येच आहेत. राजभवनकडून याबाबत अधिकृत काहीही संवाद साधण्यात आला नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आल्याचा दावा राजभवन करून केला जात आहे.

दरम्यान, बोस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतही पोलिसांवर आरोप केले होते. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारातील पीडित भेटण्यासाठी आले असताना त्यांना राजभवनात येण्यापासून रोखण्यात आले. कोलकाता पोलिस काम करण्यापासून आपल्याला रोखत असल्याचा आरोपही बोस यांनी केला.

सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यपाल राजभवनातील जवळपास 100 पोलिसांना हटवू पाहत आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांकडून नजर ठेवली जात असल्याचा दावा राज्यपालांकडून केला जात आहे. बोस यांना झेड सुरक्षा आहे. तर कोलकाता पोलिसांची सुरक्षा केवळ राजभवन परिसरासाठी आहे.

राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राजभवनची इमारत हेरिटेज आहे. बांधकाम विभागाकडून त्याची देखभाल केली जाते. या परिसराच्या सुरक्षेची जबाबदार कोलकाता पोलिसांची आहे. या परिसरात अनेक मंत्री राहतात. त्यामुळे राज्यपाल पोलिसांना असे आदेश देऊ शकत नाहीत. याबाबत आवश्यकता भासल्यास कायदेशीर सल्ला घेतला जाऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT