New Delhi : नीट पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच तापला असून आता त्यावरून बिहारच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी पेपरफुटीची लिंक थेट राष्ट्रीय जनता दलाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी जोडली आहे.
तेजस्वी यादव यांच्या खासगी सचिवाने पेपरफुट प्रकरणाच्या मास्टरमाईंडला शासकीय गेस्टहाऊस मिळवून दिल्याचा आरोप केला आहे. या गेस्टहाऊसमधील एका खोलीतच परीक्षार्थींकडून पैसे घेत परीक्षेच्या आदल्यादिवशी प्रश्नपत्रिका दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
बिहार पोलिसांनी केलेल्या तपासात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पटना येथील गेस्टहाऊसमधील खोली क्रमांक 404 मध्ये कथित पेपरफुटीचा प्रकार घडला आहे. याच ठिकाणी परीक्षार्थींकडून प्रश्नपत्रिकेसाठी लाखो रुपये घेण्यात आले. आदल्यादिवशी हा सर्व प्रकार घडला. परीक्षार्थींकडून उत्तरेही पाठ करून घेण्यात आली.
बिहार पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक केले आहे. त्यातीलच एका विद्यार्थ्यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना जे प्रश्न देण्यात आले होते, तेच प्रश्न परीक्षेत आले. या घोटाळ्याचा मास्टरमाईंड सिंकदर यादवेंदू असून त्याने आपल्या मेहुण्याची पत्नी आणि मुलासोबत इतर परीक्षार्थींना गेस्टहाऊसमध्ये बोलवले होते, असे तपासात समोर आले आहे.
गेस्टहाऊसमधील खोली मिळावी, यासाठी एका मंत्र्यांनी पत्र लिहिले होते, अशीही चर्चा आहे. त्यानुसार त्यांना खोली मिळाली होती. याबाबत पोलिस खातरजमा करत आहेत. त्यावरून आरजेडीने नितीश कुमार सरकारमधील मंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
दुसरीकडे भाजपने थेट तेजस्वी यादव यांच्याकडे बोल दाखवले आहे. यादव यांचे पीएस प्रीतम कुमार यांनीच सिकंदरसाठी खोली बुक केली होती. खोली बुक करताना प्रीतम यांनी वापरलेला मंत्री हा शब्द तेजस्वी यांच्यासाठी होता, असा आरोप उपमुख्यमंत्री व भाजप नेते विजय सिन्हा यांनी केला आहे. या प्रकरणी सीबीआयने प्रीतम व तेजस्वी यांची चौकशी करावी. त्यानंतर पेपरफुटीत कुणाचा हात आहे, हे स्पष्ट होईल, असे निशाणाही सिन्हा यांनी साधला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.