Modi Jhalmudi Vikram Shaw .jpg Sarkarnama
देश

PM Modi Jhalmuri: पश्चिम बंगालमध्ये प्रचारावेळी मोदींना 'झालमुडी'च्या प्रेमात पाडणाऱ्या विक्रेत्यासमोर नवं संकट; पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली

West Bengal News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी झाडग्राम येथे विक्रम साव या रस्त्यावरील विक्रेत्यानं झालमुडी (तिखट भेळ) खायला दिली होती.

Deepak Kulkarni

West Bengal News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी झाडग्राम येथे विक्रम साव या रस्त्यावरील विक्रेत्यानं झालमुडी (तिखट भेळ) खायला दिली होती. मोदींनी आपला सर्व ताफा अचानक थांबवत या स्थानिक विक्रेत्याच्या हातची झालमुडीचा आस्वाद घेतला होता. मोदींच्या या अनपेक्षित भेटीमुळे विक्रम साव आणि त्यांची झालमुडी देशभरात चांगलीच गाजली. पण आता या विक्रेत्यासमोर नवं संकट उभं ठाकलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये अचानक थांबून स्थानिक विक्रेत्याच्या हातची झालमुडी खाल्ल्याचा हा व्हायरल व्हिडिओ झाला होता. मोदींनी स्वत:त्यांच्या सोशल मीडियावरुन झालमुडी खातानाचे व विक्रम साव यांच्यासोबतचे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. पण झालमुडी विक्रेते विक्रम साव यांच्यासाठी हेच क्षण मोठं टेन्शन वाढवणारे ठरले आहेत.

विक्रम साव यांना आता थेट जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. या झालमुडी विक्रेत्याला आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून फोन येत असून त्यात थेट जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. खळबळजनक बाब म्हणजे हे सर्व हे फोन पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून येत असल्याची माहिती स्वत:साव यांनी दिली आहे.

सततच्या या धमक्यांच्या फोनमुळे पश्चिम बंगालमधील झालमुडीचे विक्रेते विक्रम साव यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेत वावरत आहे. साव यांनी यावेळी गंभीर आरोप केले आहेत.

ते म्हणाले,पंतप्रधान मोदींनी आमच्या दुकानावर येत झालमुडी खाल्ल्यानं आम्हांला मिळालेली अचानक प्रसिद्धी हीच मोठी डोकेदुखी ठरत आहे.गेल्या काही दिवसांपासून माझ्या फोनवर पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून फोनकॉलसह व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल येत आहेत.

या मोबाईल फोन आणि व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलमधून विक्रम साव आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या आणि गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरुन येत असलेल्या धमक्यांमुळे साव आणि त्यांच्या कुटुंबाना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

या सततच्या फोन कॉल आणि धमक्यांच्या त्रासाला कंटाळून विक्रम साव यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणाची सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. साव यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या फोन कॉल आणि व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलबाबतचा तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT