

New Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपला 400 प्लसचं मिशल फसल्यानंतर केंद्रात नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करावी लागली होती. पण विरोधकांसह भाजपही नितीश कुमार कधी पलटी मारतील हे सांगू शकत नाही. यामुळे मोदी-शाह आता केंद्रातलं एनडीएचं सरकार मजबूत करण्याच्या उद्देशानं मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालसह तामिळनाडू या दोन राज्यात धक्कादायक निकालाची नोंद झाली. त्यात बंगालमध्ये ममता बॅनर्जींना सत्तेतून खाली खेचत भाजपनं कमळ फुलवलं. तर तामिळनाडून एम.के.स्टॅलिनच्या सत्तेला उलथवून टाकत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं जोरदार मुसंडी मारली. काँग्रेसला सोबत घेत येथे जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापन केली.
तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीत झालेलं सत्तांतर मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत ठरण्याची चिन्हे आहेत.कारण स्टॅलिन यांच्या अण्णा द्रमुक पक्षावर या निवडणुकीत सत्ता गमावण्याची नामुष्की ओढवली. परंतू,विरोधकांच्या इंडिया आघाडीतील सोबत असलेल्या आणि तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका द्रमुक आणि काँग्रेसनं युतीत लढल्या होत्या.पण आता पराभवाचा धक्का बसलेल्या द्रमुकची साथ काँग्रेसनं सोडली आहे.
काँग्रेस एवढ्यावरच थांबले नाही, तर या पक्षानं थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षासोबत युती करत सत्तेत जाणं पसंत केलं. काँग्रेसनं निकालानंतर बदललेली भूमिका अण्णा द्रमुकसाठी मोठा धक्का मानली जात आहे. कारण केंद्रासह राज्यातही द्रमुकने काँग्रेसला कायमच साथ दिली आहे.
मात्र, आता काँग्रेस पक्षानं थेट प्रतिस्पर्धी थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षासोबतच नवीन घरोबा केल्यानं द्रमुक पक्ष दुखावला गेल्याची चर्चा आहे. पण द्रमुकला जरी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करत सत्ता गमवावी लागली असली,तरी तमिळनाडूत द्रमुकचे तब्बल 30 खासदार आहेत. हा आकडा आजच्या घडीला मोदी-शहांसाठी निश्चितच मोठा आधार ठरणारा आहे.
याच पार्श्वभूमीवर मोदी-शाह यांच्याकडून तमिळनाडूत निकालानंतर काँग्रेसकडून दुखावलेल्या गेलेल्या एम.के.स्टॅलिन यांच्या अण्णा द्रमुक पक्षाशी हातमिळवणी करण्याच्या उद्देशाने राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबतची राजकीय चर्चा तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळासह दिल्लीतही दबक्या आवाजात सुरू आहे.
भाजपनं केंद्रातील एनडीए सरकार लोकसभा आणि राज्यसभेत आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे.आजच्या घडीला स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष लोकसभेत मोठा ताकदवान पक्ष समजला जातो.
एनडीएसोबत सध्या असलेल्या नितीश कुमारांची जेडीयू,चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी,एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांसह कोणत्याही मित्रपक्षांमध्ये 20 पेक्षा जास्त खासदारांचा आकडा नाहीत. यातुलनेत अण्णा द्रमुकची मोठी ताकद दिसून येते.
तामिळनाडूतील प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे संसदेत एकूण 30 खासदार निवडून आले आहेत. या घडीला द्रमुकचे लोकसभेत 22 आणि राज्यसभेत 8 खासदार आहेत. परंतू, आजपर्यंत भाजपचा कट्टर विरोधक राहिलेला द्रमुकला एनडीएमध्ये आणणं मोदी-शाह यांच्यासाठी नक्कीच सोपं नसणार आहे.
भाजपचे राजकीय चाणक्य अमित शाह हे अण्णा द्रमुकसारखा संसदेत मोठं संख्याबळ असलेल्या पक्षाचा थेट सत्तेत सहभागी होण्यास तयार नसेल तर बाहेरुन पाठिंबा मिळवण्यासाठीही प्रयत्नशील राहू शकतात.
काँग्रेसनं थलपती विजय यांच्या टीव्हीकेशी युती केल्यानंतर इंडिया आघाडीला मोठा तडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मागचं प्रमुख कारण म्हणजे एम.के.स्टॅलिन यांनी लोकसभेत त्यांच्या द्रमुक पक्षाच्या खासदारांना काँग्रेसपासून वेगळी आसन व्यवस्था करण्याची विनंती लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे केली होती.
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो,तसेच कोणीच कोणाचा कायमचा मित्रही नसतो असं नेहमी म्हटलं जातं. त्याच उक्तीनुसार,भाजप द्रमुकशी जुळवून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. एम.के.स्टॅलिनही तामिळनाडूतील थलपती विजय यांच्या प्रचंड झंझावातासमोर टिकवून राहण्यासाठी मोठा प्लॅन आखण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.