West Bengal BJP news : पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर विरोधी गोटात चलबिचल सुरू झाली आहे. प्रामुख्याने १५ वर्षांपासूनची सत्ता भूईसपाट झाल्याने तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तृणमूलचे एक-दोन नव्हे तर तब्बल २० खासदार आणि ५० आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपमधील बड्याने त्यानेच केला आहे. त्यामुळे बंगालसह देशाच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे ४२ पैकी २९ खासदार आहेत. तर भाजपकडे १२ आणि काँग्रेसकडे एक खासदार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल २०८ जागा जिंकत विरोधकांचा सुपडा साफ केला. त्यानंतर आता तृणमूलमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी याबाबत धक्कादायक विधान केले आहे.
खान यांनी दावा केला आहे की, तृणमुलचे सुमारे ५० आमदार आणि २० खासदार नाराज असून ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हिरवा कंदील दाखविल्यास ते पक्षांतर करण्यासाठी सज्ज आहेत. पक्षाच्या संपर्कात असलेल्या नेत्यांना प्रवेश देण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतल्यास तृणमूलचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल, असे खान यांनी म्हटले आहे.
तृणमूलचे खासदार सौगत राय यांनी खान यांचा दावा खोडून काढला आहे. भाजप नेत्याच्या विधानामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे अत्यंत खोटारडे विधान आहे. सौमित्र खान आणि भाजप अफवा पसरवत आहे. असे काहीही होणार नाही, असे राय यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राय यांना दावा फेटाळला असला तरी खान यांचे विधान हे तृणमूलच्या खासदार काकोली घोष दस्तीगीर यांच्या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबतच बैठकीतील उपस्थितीनंतर आले आहे.
काकोली घोष यांच्यासोबत पक्षाचे सहा आमदारही उपस्थित होते. घोष यांना लोकसभेच्या मुख्य प्रतोद या पदावरून हटविण्यात आल्यानंतर त्या नाराज झाल्या आहेत. त्यानंतर लगेच केंद्राने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविली होती. त्यामुळे त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच मागील काही दिवसांपासून तृणमूलच्या अनेक नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानेही तृणमूलमधील नेत्यांमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.