Congress vs TVK : विजय अन् काँग्रेसमध्ये 15 दिवसांतच वादाची ठिणगी; PM मोदींच्या 'त्या' निर्णयाकडे लक्ष

S Jaishankar news, Cauvery water dispute : तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मागील अनेक वर्षांपासून कावेरी नदीच्या पाण्यावाटपाच्या मुद्द्यावर वाद आहे.
Rahul Gandhi, C. Vijay
Rahul Gandhi, C. VijaySarkarnama
Published on
Updated on

CM Vijay latest news : तमिळनाडूमध्ये काँग्रेस जुना मित्र डीएमकेची साथ सोडत मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. विजय यांच्या कॅबिनेटमध्ये काँग्रेसचे दोन आमदार मंत्रीही आहेत. तब्बल ५९ वर्षांनंतर काँग्रेसच्या पदरात मंत्रिपद पडले आहे. मात्र, आता काँग्रेस आणि टीव्हीकेमध्ये एका मुद्द्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यातच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हा वाद अधिक वाढविण्याचा उघड प्रयत्न केला आहे.

नेमकं काय घडलं?

कर्नाटक सरकारच्या कावेरी धरणावरील मेकेदातू धरणाच्या बांधकामाला परवानगी देऊ नये, असे पत्र मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. कर्नाटक सरकारने याबाबतचा प्रस्तावर केंद्र सरकारला पाठविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विजय यांनी या धरणाला विरोध करत मंगळवारी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले. कर्नाटकचा प्रस्ताव म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यावर आता पंतप्रधान काय भूमिका घेणार, यावर पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर तामिळनाडूच्या सत्तेतही काँग्रेसचा सहभाग आहे. त्यामुळे मेकेदातू धरणाचा प्रस्ताव काँग्रेसची डोकेदुखी वाढविणारा ठरणार आहे. त्याचीच प्रचिती एस. जयशंकर यांनी सोशल मीडियात पोस्ट करत दिली. त्यांनी थेट काँग्रेसला डिवचले असून टीव्हीके आणि काँग्रेसमध्ये वाद पेटविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

Rahul Gandhi, C. Vijay
महिला IPS अधिकाऱ्याचं 'ते' खळखळून हसणं व्हायरल; काही मिनिटांतच अडकल्या वादात

काय म्हणाले जयशंकर?

जयशंकर यांनी पोस्टमध्ये मुख्यमंत्री विजय यांना उद्देशून म्हटले आहे की, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. त्याच काँग्रेसच्या दोन आमदारांना तुमच्या तामिळनाडू कॅबिनेटमध्ये ५९ वर्षांनी स्थान दिले आहे. त्यानंतर तुम्ही आघाडीतील मित्रपक्षासोबत बोलण्याऐवजी पहिल्यांदा पंतप्रधान मोदींकडे गेलात. याचा अर्थ टीव्हीकेलाही काँग्रेसच्या मैत्रीवर विश्वास नाही?, असा सवाल जयशंकर यांनी केला आहे.

Rahul Gandhi, C. Vijay
Debashish Samantaray : खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा, माजी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू नेत्याचा काही तासांतच भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मागील अनेक वर्षांपासून कावेरी नदीच्या पाण्यावाटपाच्या मुद्द्यावर वाद आहे. प्रामुख्याने तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये अनेकदा मोठी आंदोलने झाली आहेत. आता या चार राज्यांपैकी तीन राज्यांत काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे काँग्रेसची कोंडी झाल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com