Election Commission  Sarkarnama
देश

Bengal SIR Update: बिहारनंतर निवडणूक आयोगाचा मोर्चा पश्चिम बंगालकडं! अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Bengal SIR Update : बंगालचे मुख्य निवडणूक अधिकाीर मनोज अग्रवाल २९ ऑगस्ट रोजी प्रस्तावित मतदार पुनर्परिक्षण प्रक्रियेवर सर्व पक्षांसोबत बैठक घेणार आहेत.

Amit Ujagare

Bengal SIR Update : बिहारमध्ये सध्या सखोल मतदार याद्या पुनर्परीक्षणावरुन (SIR) मोठा वाद सुरु असतानाच निवडणूक आयोगानं आता आपला मोर्चा पश्चिम बंगालकडं वळवला आहे. बंगालमध्ये देखील आता SIR करण्याची तयारी आयोगानं सुरु केली आहे. यासाठी आयोगानं पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक नियुक्त्या करण्यासह या प्रक्रियेच्या तयारीला वेग देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर अग्रवाल यांनी २७ ऑगस्ट रोजी यासंदर्भात राज्याच्या DEO ना एक पत्र पाठवलं आहे.

सुत्रांच्या अनुसार, मनोज अग्रवाल यांनी २६ ऑगस्ट रोजी मुख्य सचिव मनोज पंत यांना एक वेगळं पत्र पाठवलं आहे. यामध्ये सरकारकडून निवडणूक नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांना सर्व रिक्तपदं तातडीनं भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण निवडणूक आयोगाकडून SIR ची घोषणा होताच त्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करता येईल. पश्चिम बंगालमध्ये मार्च-एप्रिल २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

२९ ऑगस्ट रोजी सीईओ मनोज अग्रवाल या SIR संदर्भात सर्व पक्षांसोबत एक बैठक करणार आहेत. यावर निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं की, आम्हाला माहिती नाही की याला SIR म्हटलं जाईल किंवा नाही. पण गेल्या निवडणुकीप्रमाणेच मतदार याद्या पुनर्परिक्षण केलं जाईल. यासाठी आम्ही ऑगस्ट महिन्यात आपली तयारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण गरज पडल्यास आम्ही सप्टेंबरपूर्वीच पहिल्या आठवड्यात पुनर्परिक्षण प्रक्रिया सुरु करु सकू.

जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात अग्रवाल म्हणाले, सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, आपल्या कोणत्याही कर्तव्य आणि काम इतर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडं सोपवू नका तसंच कोणत्याही परिस्थितीत आपला ERONET आयडी आणि ओटीपी कोणत्याही डेटा एन्ट्री ऑपरेटर किंवा इतर अधिकाऱ्यासोबत शेअर करु नका.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT