Pimpri-Chinchwad: शहर कार्यकारिणीत मिळालं नाही मनासारखं पद! भाजपच्या पदाधिकाऱ्यानं दिला थेट आत्मदहनाचा इशारा

Pimpri-Chinchwad BJP : भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न घाटे यांनी तब्बल साडे तीनशे जणांची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे.
Pimpri Chinchawad
Pimpri Chinchawad
Published on
Updated on

Pune News : भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न घाटे यांनी तब्बल साडे तीनशे जणांची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. मात्र, कार्यकारणी जाहीर होतात मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह सुरू झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कार्यकारणी जाहीर होताच 24 तासांच्या आत राजीनामा सत्र सुरू झालं आहे. माजी उपमहापौर तुषार रघुनाथ हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा शहराध्यक्षांकडं सोपवला. तर दुसऱ्या एका कार्यकर्त्याला मनासारखं पद न मिळाल्यानं त्यानं थेट आत्मदहनाचा इशाराच दिला आहे.

Pimpri Chinchawad
Arun Gavali: मोठी बातमी! अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर! 18 वर्षांनंतर येणार तुरुंगातून बाहेर

यामध्ये लिहिलं आहे की कालच माझी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आज मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. आणि यापुढील काळात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्ष वाढीसाठी त्याच जोमाने काम करत राहीन असं या राजीनाम्यात नमूद करण्यात आला आहे. त्यांना देण्यात आलेल्या पदावरून नाराज असल्याचे सांगितला जातो त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं बोलत आहे.

Pimpri Chinchawad
IIM : पिंपरी-चिंचवडकरांना सरकारचं मोठं गिफ्ट! नागपूर IIMचं कॅम्पस होणार सुरु; पण कुठे अन् कधी?

हिंगे यांच्यापाठोपाठ संतोष तापकीर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत तापकीर यांनी शहराध्यक्षांना एक पत्र लिहिले आहे. त्यात म्हंटल आहे की भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) गेल्या ३० वर्षांपासून निष्ठावान कार्यकर्ते असलेले संतोष भाऊसाहेब तापकीर यांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. पक्षाने नव्याने जाहीर केलेल्या शहर कार्यकारिणीत आपले खच्चीकरण केल्याचा दावा त्यांनी केला असून, येत्या दोन दिवसांत पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

Pimpri Chinchawad
Arvind Kejriwal: ट्रम्प भित्रा माणूस त्यामुळं....; केजरीवालांनी मोदी सरकारला दिला भन्नाट सल्ला, आकडेवारीच केली सादर

तापकीर म्हणाले, माझे वडील कै. भाऊसाहेब ज्ञानेश्वर तापकीर हे पक्ष स्थापनेपासून निष्ठावान कार्यकर्ते होते. स्वतः संतोष यांनी गेल्या तीन दशकांपासून पक्षाच्या आंदोलनांमध्ये, मोर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी मंडल सरचिटणीस, दोन वेळा मंडल अध्यक्ष, किसान मोर्चा शहराध्यक्ष, शहर उपाध्यक्ष आणि शहर चिटणीस अशा विविध पदांवर प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र, नव्याने जाहीर झालेल्या शहर कार्यकारिणीत त्यांना अपेक्षित शहर सरचिटणीस पदाऐवजी कमी महत्त्वाच्या जबाबदारीने त्यांचे खच्चीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com