exit polls sarkarnama
देश

Lok Sabha Election Exit Poll : एक्झिट पोलचे अंदाज किती खरे किती खोटे! मागील तीन निवडणुकीत काय झाले?

Roshan More

Lok Sabha Election Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आज (शनिवारी) पार पडले. आणि लोकसभेची रणधुमाळी थांबली. पण, लगेच एक्झिट पोल जाहीर होत असल्याने कोणाचे सरकार सत्तेत येणार याचा अंदाज या एक्झिट पोलमुळे येणार आहे. मात्र, हे एक्झिट पोल किती खरे ठरतात हे मागील काही निवडणुकांचे एक्झिट पोलने जाहीर केलेल्या आकेडवरून समजते.

2014 ला देशात मोदी लाट होती. भाजपचे BJP सरकार येणार हे जवळपास निश्चित होते. त्यामुळे एक्झिट पोल्सचा अंदाज देखील तसाच होता. तेव्हा जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीएला बहुमत मिळत असल्याचे आकडे सांगत होते.

283 जागा एनडीएला मिळेल असा अंदाज होता. तर, काँग्रेसप्रणीत Congress युपीएला 120 जागांचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला होता. एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये आणि प्रत्यक्ष निकालात फरक होता. कारण एनडीएला तब्बल 336 जागा आणि युपीएला अवघ्या 60 जागा मिळाल्या होत्या.

2019 मध्ये काय?

2019 मध्ये एक्झिट पोलमध्ये एनडीएला 306 जागा तर, युपीएला 120 जागा सरासरी दाखवत होत्या. प्रत्यक्षात एनडीएला 353 तर युपीएला 93 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा काँग्रेसला 52 तर भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या.

2009 मध्ये काय?

एक्झिट पोलच्या अंदाजांना सर्वात मोठा धक्का 2009 च्या लोकसभा निवडणुकी बसला होता. कारण एक्झिट पोलनुसार भाजप प्रणीत एनडीएला 185 तर काँग्रेसप्रणीत युपीएला 158 जागा मिळण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात काँग्रेसलाच 206 तर युपीएला 262 जागा मिळाल्या. तर भाजपला 116 जागा मिळत एनडीएला 158 जागा मिळाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT