One Nation-One Election News : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. तसेच 'वन नेशन-वन इलेक्शन' साठी समितीही गठीत केली आहे. त्यावरून आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी रविवारी हरियाणातील भिवानी येथे बोलताना राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
'वन नेशन-वन इलेक्शन' बाबत केंद्रातील भाजप (BJP) सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले, भाजपने 'वन नेशन, वन इलेक्शन'चा नवा नारा दिला आहे. त्यातून सर्वसामान्यांना काहीही मिळणार नाही. यामुळे केंद्र सरकारने करायचेचे असले तर एकसमान शिक्षण करावे, 'वन नेशन, वन इलेक्शन' ऐवजी 'एक राष्ट्र, एक शिक्षण' असायला हवे.
ज्याप्रमाणे श्रीमंताच्या मुलाला शिक्षण मिळते, त्याचप्रमाणे माझ्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. जिथे गरीब आणि श्रीमंतांच्या मुलांना समान शिक्षण मिळाले पाहीजे. तसेच वन इलेक्शन'च्या धर्तीवर उत्तम आरोग्य सेवा दिली पाहिजे. त्यामुळे 'वन नेशन-वन ट्रीटमेंट' करणे काळाजी गरज आहे. सर्वांना चांगले उपचार मिळाले पाहिजे, अशी मागणी केजरीवाल यांनी केला.
एक निवडणुक घ्या किंवा अनेक निडवणुका घ्या, आम्हाला काही फरक पडत नाही. मात्र, 'एक राष्ट्र, एक उपचार' सुरू केले पाहिजे, सर्वांना चांगले उपचार मिळाले पाहिजे. गरीब-श्रीमंत सर्वांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे. 'वन नेशन, वन ट्रीटमेंट' आणि एक राष्ट्र, एक शिक्षण, असेल तेव्हाच आमचा फायदा होईल, असे केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, देशभरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील या समितीत गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी, माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, माजी वित्त आयोगाचे अध्यक्ष एनके सिंह, माजी लोकसभा महासचिव सुभाष सी कश्यप, ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि माजी सीव्हीसी संजय कोठारी यांचा समावेश आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.