Ranvir Shingh _in Dhurandar -2  
देश

Dhurandhar 2 : "'धुरंधर' पाहिलेले प्रेक्षक भाजपला मतदान करणारेत, त्यामुळं मी निश्चिंत"; मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक विधान

Dhurandhar 2 धुरंधर सिनेमा हा भाजप सरकारची प्रसिद्धी करणारी जाहिरात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यामुळं हा प्रोपोगंडा सिनेमा असल्याची टीका धुरंधरवर होत आहे.

Amit Ujagare

Dhurandhar 2 : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतो आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच धुरंधरचा पहिल्या भागालाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. पण हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला आहे. कारण या सिनेमाला विरोध करणाऱ्यांनी हा सिनेमा म्हणजे भाजपच्या सरकारची प्रसिद्धी करणारी जाहीरात असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं हा प्रोपोगंडा सिनेमा असल्याची टीका या सिनेमावर होत आहे.

तर दुसरीकडं हा सिनेमा काल्पनिक असून यातील घटनांचं सत्य घटनांशी साध्यर्म असेल तर तो निव्वळ योगायोग आहे, असं सिनेमाच्या दिग्दर्शकानं सिनेमाच्या डिस्क्लेमरमध्येच सांगितलं आहे. पण सिनेमाच्या विरोधकांच्या आरोपांना पुष्टी देणारं खळबळजनक विधान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

भाजपचा प्रचारपट

आसाममध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. आसामबरोबरच इतर चार राज्यांत अर्थात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी अशा एकूण पाच राज्यांमध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांची आचारसंहिता सुरु असतानाच धुरंधर -२ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमामध्ये मोदी सरकारनं केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला योग्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याचबरोबर या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फुटेज वापरण्यात आलं असून मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर शत्रू राष्ट्रांविरोधात अधिक तीव्रपणे काम होऊ लागल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रचार धुरंधर सिनेमाच्या दोन्ही भागांमधून करण्यात आल्याची चर्चा आहे.

धुरंधर पाहणारे भाजपला मतदान करणार

या चर्चा सुरु असतान आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्व सर्मा यांना धुरंधर सिनेमावर होणाऱ्या टीकेवर काही पत्रकारांनी प्रश्न विचारला की, हा सिनेमा म्हणजे भाजप-आरएसएसचा अजेंडा असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सर्मा म्हणाले, "धुरंधर सिनेमावर टीका होत असली तरी तुम्हा पाहात आहात की किती लोक हा सिनेमा पाहायला जात आहेत. म्हणजे जगात आता भाजप-आरएसएसचे लोक जास्त झाले आहेत. धुरंधर किती जोरदार चालला आहे, तो धमका करतो आहे. म्हणजेच जे लोक धुरंधर बघायला जात आहेत ते भाजपला मतदान करणार आहेत, हे माझ्यासाठी चांगलंच आहे. मी धुरंधर पाहिलेला नाही, धुरंधर भाग देखील पाहिलेला नाही. मी जास्त चित्रपट पाहात नाही मला सिनेमाची आवड नाही. पण जेव्हा लोक म्हणताहेत की हा भाजपचा चित्रपट आहे तेव्हा मी विचारलं की हा सिनेमा हाऊसफुल्ल आहे की नाही? त्यावर चित्रपट हाऊसफुल्ल असल्याचं सांगत आहेत म्हणजेच भाजप जिंकणार आहे"

कमाईचे रेकॉर्ड मोडले

दरम्यान, धुरंधर भाग एक जो डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता त्यानं बॉलिवूडचे कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले असून जवळपास १००० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर याचा दुसरा भाग धुरंधर २ या सिनेमाची देखील जोरदार घोडदौड सुरु आहे. आदित्य धर या सिनेमाचा दिग्दर्शक असून रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आदी कलाकार या सिनेमात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT