Saayoni Ghosh Sarkarnama
देश

Saayoni Ghosh ED News: बंगाली अभिनेत्री, तृणमूल नेत्या ED च्या रडारवर; शिक्षक भरतीशी कनेक्शन

सरकारनामा ब्यूरो

TMC ED News: ममता बनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. यात आणखी एका नावाची भर पडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष सायोनी घोष यांना ईडीनं समन्स बजावले आहे. (saayoni ghosh what is her connection with west bengal teacher recruitment scam)

त्यांना ३० जून रोजी कोलकाता येथील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे या सायोनी घोष कोण आहेत, त्यांचे शिक्षक भरती गैरव्यवहारात नाव कसे आले, हे जाणून घेऊया.

बंगाली चित्रपटात अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या सायोनी घोष या गायिका देखील आहेत. 'नोटोबोर नॉटआउट'या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. एका पोलीस तक्रारीनंतर २०२१ मध्ये सायोनी या सर्वात चर्चेत आल्या. हिंदू समाजाच्या अवमान केल्याप्रकरणी तथागत रॉय यांनी त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या पोलीस तक्रारीच्या एक महिन्यानंतर त्यांनी सायोनी घोष यांनी चित्रपटसृष्टीतून राजकारणात एन्ट्री घेतली.फेब्रुवारी २०२१ मध्ये त्या तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्या.

मार्च २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने त्यांना पश्चिम बंगालमधील आसनसोल दक्षिण मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानातून उतरवलं होते. या निवडणुकीत भाजप उमेदवार अग्निमित्रा पॅाल यांनी त्यांचा पराभव झाला. पण हिंमत न हरता सायोनी घोष या पक्षात सक्रिय राहिल्या. जून २०२१ मध्ये तृणमूलच्या विद्यार्थी परिषदेच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली.

शिक्षक भरती गैरव्यवहारात सहभागी ?

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती गैरव्यवहारात अनेक जणांना अटक करण्यात आली. या तपासात सायोनी घोष यांचे नाव पुढे आले आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीकडे सायोनी घोष यांच्या विरोधात पुरावे असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या महिन्याच्या सुरवातीला शिक्षक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. यात टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना ईडीनं समन्स पाठवलं होते. पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी, त्यांचे निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी व शिक्षण विभागाशी संबधीत अनेक मोठे अधिकाऱ्यांची ईडीने चौकशी केली आहे तर काहींना अटक केली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT